Tuesday , October 16 2018
Breaking News

अर्थ

भारतीय रुपया पुन्हा घसरला

मुंबई- आंतरराष्ट्रीय बाजारातील परिणामामुळे आज पुन्हा एकदा डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. निर्यातदारांकडून अमेरिकी डॉलरच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय रुपया ९ पैशांनी घसरून 73.92 रुपयांवर पोहोचले. काही दिवसांपूर्वी रुपया डॉलरच्या तुलनेत ७५ रुपयाच्या जवळपास पोहोचला होता. त्यानंतर रुपया मजबूत होण्यास सुरु झळ होता पुन्हा रुपया ७३ वर आला …

अधिक वाचा

80 टक्के कंपन्यांकडून डेटा स्टोरेज नियमांचे पालन; इतर कंपन्यांकडून मुदत वाढीची मागणी

नवी दिल्ली- गूगल, ऍमेझॉन, पेटीएम आणि व्हाट्सअप समवेत इतर पेमेंट उद्योगातील 80 टक्के कंपन्यांनी रिझर्व बँकेच्या डेटा लोकॅलायझेशनच्या सूचनेचे पालन केले आहे. मात्र अद्यापही काही कंपन्या आहेत ज्यांनी सूचनेचे पालन केलेले नाही. त्यांच्याकडून मुदत वाढीची मागणी होत आहे. ही मुदत १५ ऑक्टोंबर पर्यंत होती, ती वाढविण्यात यावी अशी मागणी होत …

अधिक वाचा

आज पुन्हा पेट्रोलचे दर वाढले:जाणून घ्या काय आहे आजचे दर

मुंबई- काल एकदिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलच्या दरात आज मंगळवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल ११ पैसे तर डिझेल २४ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८८.२९ रुपये लीटर तर डिझेल ७९.३५ पैसै लीटर झाले आहे. केंद्र व राज्य सरकारने मिळून ५ रुपयांनी कर कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर दररोज …

अधिक वाचा

आज पेट्रोल नाही डिझेलचे दर वाढले

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. आज थोडासा दिलासा मिळाला आहे. आज पेट्रोलचे दर स्थिर राहिले तर मुंबईत डिझेल ८ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८८.१८ रुपये तर डिझेल ७९.११ रुपये प्रति लिटर असे आजचे दर आहेत. दिल्लीत पेट्रोल ८२.७२ आणि डिझेल ७५.४६ पैसे प्रति …

अधिक वाचा

पेट्रोल-डीझेलच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारचा हा नवा फॉर्म्युला

मुंबई- इंधनाच्या वाढत्या दराने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार नवीन फॉर्म्युल्यावर विचार करीत आहे. भारत आणि इराण दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमती कमी करण्याबाबत विचार केले जात आहे. भारत कच्च्या तेलाच्या खरेदीच्या बदल्यात इराणला तांदूळ आणि अन्य वस्तू देऊ देणार असल्याचे बोलले जात आहे असे झाल्यास इराण भारतला कमी किंमतीत …

अधिक वाचा

रुपया पुन्हा २४ पैशांनी घसरून ७५ रुपयाच्या जवळ पोहोचला

मुंबई- विदेशी चलनातून बाहेर पडणाऱ्या आणि स्थानिक समभाग बाजारपेठेतील तीव्र नुकसान यामुळे आयातदारांकडून अमेरिकन चलनाची मागणी वाढल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया 24 पैशांनी घसरून 74.45 वर बंद झाला. इंटरबँक फॉरेन एक्सचेंज (फॉरेक्स) मार्केटमध्ये, देशी चलन 74.37 वर कमजोर झाले आणि 74.45 च्या सर्व काळातील नीचांकी पातळीवर खाली घसरले आणि सुरुवातीच्या व्यवसायात …

अधिक वाचा

वातावरणातील बिघाडामुळे भारताचे ७९.५ अब्ज डॉलरचे नुकसान

नवी दिल्ली- जागतिक अर्थव्यवस्थेवर तीव्र हवामान घटनांचा प्रभाव दर्शविणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार गेल्या 20 वर्षांत हवामानविषयक आपत्तीमुळे भारताला 79 .5 अब्ज डॉलरचा आर्थिक नुकसान झाला आहे. काल हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. वादळ, पूर आणि भूकंप याचा यात समावेश आहे. ‘आर्थिक नुकसानी, दारिद्र्य आणि आपत्ती 199 8-2017’ या काळातील …

अधिक वाचा

आज पुन्हा पेट्रोलचे दर वाढले

मुंबई- आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. काल फक्त डिझेल महागले होते. मात्र आज पेट्रोल प्रति लिटर ९ पैसे तर डिझेल प्रति लिटर ३० पैशांनी महागले आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८७.९२ रूपये झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७८.२२ रूपये झाली आहे. सणासुदीच्या …

अधिक वाचा

शेअर मार्केट हादरले; सेन्सेक्स १००० अंकांनी खाली

मुंबई-शेअर बाजार सुरू होताच आज बाजारात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळले असून आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमधील घसरणीचे पडसाद शेअर बाजारात उमटले. दुसरीकडे रुपयाची घसरणही सुरुच असून रुपयाने आज ऐतिहासिक तळ गाठला. गेले काही दिवस शेअर मार्केटमध्ये पडझड सुरु असतानाच बुधवारी शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सने ४६१ अंकांची मुसंडी घेतली …

अधिक वाचा

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा दिवाळी पगार बोनस

नवी दिल्ली- रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा बोनस जाहीर झाला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास १२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. यातील …

अधिक वाचा
error: Content is protected !!