Sunday , January 20 2019
Breaking News

featured

कसोटीनंतर वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय !

मेलबर्न: भारत वि.ऑस्ट्रेलियात आज तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना झाला. यात भारताने विजय मिळवीत २-१ च्या फरकाने मालिका जिंकली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा मॅच फिनीशरची भूमिका बजावली. आजच्या सामन्यात युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाला …

अधिक वाचा

युजवेंद्र चहलची दमदार कामगिरी; ४२ धावा देत घेतल्या ६ विकेट्स !

मेलबर्न- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात एकदिवसीय सामना सुरु आहे. तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आज चमकदार कामगिरी केली. चहलच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. चहलने ४२ धावा देत ६ विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २३० धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट घेणारा तो …

अधिक वाचा

राज्यात पुन्हा सुरु होणार डान्सबार; सुप्रीम कोर्टाकडून अटी शिथील

मुंबई- डान्सबारसंदर्भात राज्य सरकारच्या अटी सुप्रीम कोर्टाने शिथील केल्या आहेत. यामुळे मुंबई आणि राज्यात पुन्हा डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतरही जनमताचा रेटा आणि सरकारवर उडालेली टीकेची झोड यामुळे राज्य सरकारने २०१६ मध्ये डान्सबारसंदर्भात नवा कायदा आणला होता. Share on: WhatsApp

अधिक वाचा

हुश्श्श…अखेर बेस्टचा संप मिटला !

मुंबई- गेल्या ९ दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला होता. अखेर आज उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटला आहे. वेतनवाढीबाबत उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अंतिम तडजोडीसाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. जानेवारी 2019 पासून कामगारांना 10 टप्प्यातील वेतनवाढ लागू करण्याचेही प्रशासनाला …

अधिक वाचा

गडचिरोलीत बस-ट्रकच्या अपघातात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

गुरुपल्ली-गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ आज बुधवारी सकाळी ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. यात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ९ जण गंभीर जखमी झाले आहे. एटापल्लीपासून पाच किमी अंतरावरील गुरुपल्ली गावाजवळ अहेरी डेपोच्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती …

अधिक वाचा

कर्जमाफीअंतर्गत आता शेतकऱ्यांना खावटी कर्जही माफ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई- देवेंद्र फडणवीस सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. ओबीसी युवकांना वैयक्तिक कर्जाची मर्यादा २५ हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच ओबीसी …

अधिक वाचा

‘मिडल क्लास’ला मिळणार दिलासा ; करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाख होणार

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून लवकरच करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दुपटीने वाढवण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठी ही मर्यादा अडीच लाखाहून पाच लाखांवर जाणार असून यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय आणि परिवहन भत्ता देखील पुन्हा सुरू केला जाण्याची शक्यता आहे. नोटाबंदीमुळे चिंताग्रस्त झालेल्या मध्यवर्गाला या निर्णयामुळे …

अधिक वाचा

आजपासून रंगणार अ.भा.म.साहित्य संमेलन; ग्रंथदिंडीला सुरुवात !

यवतमाळ – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी यवतमाळमध्ये आज ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दुपारी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधारक येडे यांना मिळाला आहे. संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली होती. तर संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरणा …

अधिक वाचा

अयोध्याप्रकरणी आजही सुनावणी नाही; २९ रोजी होणार सुनावणी !

नवी दिल्ली – अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या विवादावर आज कोणतीही सुनावणी होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी आज केवळ तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. २९ जानेवारीला नियमित सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे. त्यानंतर नवीन घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती लळित यांची …

अधिक वाचा

राष्ट्रवादीला उज्ज्वल निकमांचा सन्मान करायचा असल्यास राज्यसभेवर पाठवावे !

भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची दैनिक जनशक्तिला विशेष मुलाखत जळगाव (जितेंद्र कोतवाल)- दहशतवादी व गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख असलेले अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांच्या नावा भोवती प्रचंड वलय आहे. याचा फायदा उचलण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु केली आहे. यासाठी …

अधिक वाचा
error: Content is protected !!