Monday , December 17 2018
Breaking News

मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार

मुंबई-जम्मू-काश्मीरमधील गुरेज भागात दहशतवाद्यांशी लढतांना वीर मरण आलेले मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव आज मुंबईत आणण्यात आले आहे. आज मीरा रोड येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी नागरीकांनी घराबाहेर गर्दी करायला सुरूवात केली आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय लष्कराच्या चार जणांना वीरमरण आले. यात मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले. मेजर राणे हे मुंबईतील मीरा रोड येथील रहिवासी होते.

थोड्याच वेळात त्यांच्यावर मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. कौस्तुभ राणे यांना नियंत्रण रेषेवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सेना शौर्यपदकाचा बहुमान मिळाला होता आणि मेजर या हुद्दय़ावर त्यांना बढतीही मिळाली होती. त्यामुळे त्यांच्याविषयी रहिवाशांच्या मनात प्रचंड अभिमान होता. मात्र त्यांच्या बलिदानानंतर मीरा रोडचा सुपुत्र गेल्याचे हळहळ व्यक्त होत आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

कोकण मंडळाची पुढच्या वर्षी ५ हजार घरांची सोडत

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांसाठी रविवार मोठ्या उत्साहात सोडत पार पडली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!