Sunday , September 23 2018
Breaking News

खान्देश

मद्यपी पतीने जलचक्रच्या विवाहितेला पेटवले

बोदवड- तालुक्यातील जलचक्र येथील 33 वर्षीय विवाहितेस मद्यपी पतीनेच पेटवून दिल्याची घटना 20 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जयनाली मो.मुलतानी (33, रा.जलचक्र) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरेापी व पती मो.नबी मुलतानी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 20 रोजी चार सुमारास जयनाली या बाजारातून घरी आल्यानंतर आरोपी …

अधिक वाचा

फैजपूरात जागतिक साळी फाउंडेशनतर्फे 10 गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

समाजाचं देण लागतो या भावनेतून संस्थेचे कार्य -विजय वक्ते फैजपूर- शहरात जागतिक साळी फाउंडेशन मुंबईतर्फे शहर तसेच परीसरातील 10 होतकरू व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. यावेळी फाऊंडेशनचे प्रणेते तथा मंत्रालयातील कक्ष अधिकारी विजय वक्ते यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही संस्था …

अधिक वाचा

धुळ्यात दोन दिवस सैन्यदलाचे प्रात्यक्षिक नागरीकांनी लाभ घावा – मंत्री डॉ. सुभाष भामरे

धुळे- धुळ्यातील राज्य राखीव दलाचा मैदानावर 29 आणि 30 सप्टेंबर रोजी भारतीय संरक्षण दलाचे जवान विविध प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. भारताच्या संरक्षणासाठी जवान कशी तयारी करतात, सैन्याचे सामर्थ्य, तोफा, रणगाडे, घोडतळ, वाहनाचे पथक, हवाई कसरती यावेळी होणार आहे. सैन्य दलाचे आगे बढो ह्या कार्यक्रमांतर्गत हे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. धुळेकरांना ही …

अधिक वाचा

धुळ्यात मोटारसाईकल चोरट्यांची टोळी जेरबंद

साडे आठ लाख किमंतीच्या 17 दुचाकी जप्त धुळे- शहरातील चाळीसगावरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने मोटारसाईकल चोरी करणार्‍या टोळींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तब्बल साडे आठ लाख किंमतीच्या 17 गाड्या चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. शहरासह जिल्ह्यात मोटारसाईकल चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही परीस्थिती लक्षात घेता निरीक्षक कुबेर चौरे यांनी शोध पथकाला …

अधिक वाचा

प.वि.पाटील विद्यालयात बालदोस्तांनी केला गणेशाचा जागर

जळगाव : के.सी.ई. सोसायटीच्या गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा होत आहे त्यातच आज बालगोपालांनी अथर्वशीर्ष पठणाने गणेशाचा जागर करून विद्यालयाचा परिसर चैतन्यमय केला. सर्वप्रथम मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली.त्यांनतर गणपती अथर्वशीर्षाच्या सामूहिक पठणाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमात एकूण 206 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 11 आवर्तने अतिशय …

अधिक वाचा

भुसावळातील मामाजी टॉकीज रस्ता एकेरी वाहतुकीसाठी उद्या होणार खुला

श्री विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर रीक्षा चालकांसह दुचाकी धारकांना दिलासा भुसावळ- शहरातील मामाजी टॉकीज रस्त्याच्या ट्रीमीक्स कामाचा शुभारंभ गत महिन्यात रविवार, 5 ऑगस्ट रोजी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते भूमिपूजनाने झाला होता. तब्बल 57 वर्षांनी रस्त्याचे भाग्य उजळल्याने शहरवासीयांसह वाहन धारकांनी समाधान व्यक्त केले होते. तब्बल 48 दिवसांपासून रस्त्याचे ट्रीमीक्स पद्धत्तीने काम …

अधिक वाचा

मेहुणीवर बलात्कार केल्याच्या संशय : मारहाणीत न्हावीतील सालदाराचा मृत्यू

परप्रांतीय मेहुण्यासह दोघांना फैजपूर पोलिसांकडून अटक फैजपूर- आपल्या मेहुणीवर अत्याचार केल्याच्या संशयातून दोघांनी न्हावीतील सालदारास बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू ओढवला. 18 सप्टेंबर रोजी ही घटना घडली तर या प्रकरणी फैजपूर पोलिसात शुक्रवारी दोघा आरोपींविरुद्ध खुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरसिंग रशा भील (50, रा.न्हावी) असे खून झालेल्या सालदाराचे नाव …

अधिक वाचा

रावेर रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्यासाठी प्रवासी संघटनेकडून निवेदन

आंदोलन छेडण्याचा ईशारा : लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची अपेक्षा रावेर- रावेर रेल्वे स्टेशनवर विविध गाड्यांना थांबा मिळवून देण्यासाठी स्टेशन मास्टरांसह वरीष्ठांना निवेदन देण्यात आले. तसेच दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला. रावेरवरुन भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, नाशिक, मुंबई, पुणे येथे जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. ये-जा करण्यास पुरेशी सार्वजनिक वाहने नसल्याने …

अधिक वाचा

बुथ जितो, देश जितो -माजी मंत्री एकनाथराव खडसे

तळवेलसह खडक्यात बुथ प्रमुखांचा मेळावा – पक्षासाठी झोकून कामाचे आवाहन भुसावळ- नागरीकांच्या अडी-अडचणी समजून घ्या, त्यांना अडचणीत मदत करून आमदार, खासदारांनी केलेल्या कामांचा आढावा तयार करा व केंद्र शासनाच्या योजना शेवटच्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा, कार्यकर्त्यांनी-मतदारांशी संपर्क वाढवा व बुथ जिंकल्यास देशही जिंकू, असा आत्मविश्‍वास माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे …

अधिक वाचा

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या गणेश उत्सवाचा आज समारोप

जळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या गणेश उत्सवाचा समारोप आज शनिवारी संध्याकाळी ७ वाजता एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार आहे. यावेळी केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांचे हस्ते १० दिवसात संस्थेच्या ज्या शाखांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, त्यांच्या प्रमुखांचा आणि गणपती म्युरल निर्मिती करिता सहकार्य करण्या-या समितीतील प्रमुखांचा सत्कार केला …

अधिक वाचा
error: Content is protected !!