Monday , November 19 2018

धुळे

खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करणे गोटेंचा उद्योग; मंत्री डॉ.भामरे यांचा टोला

धुळे-माझ्या मुलाच्या हॉस्पिटला शासनाकडून ४५ कोटी रुपये मिळाले असा खोटा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला. माझा मुलगा आणि तीन कॅन्सर सेशलिस्ट यांनी मिळवून हे हॉस्पिटल सुरु केले आहे. एचडीएफसी बँकेकडून १८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. परंतु आयुष्यभर सतत खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करणे एवढाच त्यांचा उद्योग आहे …

अधिक वाचा

निवडणूकीनंतर सोनगीरचा पाणी प्रश्न सोडवू- आयुक्त

धुळे- धुळे शहरापासून 20 किमी अंतरावर सोनगीर गाव आहे. यागावातून धुळे महापालिकेची तापी पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन जाते. सोनगीरला गावाला पाणी पुरवठा करणारे जामफळ धरण कोरडेखट पडले आहे. त्यामुळे जामफळ धरणात महापालिकेने रॉवॉटर सोडावे अशी मागणी करीत सोनगीर ग्रामस्थांनी गुरुवारी केली. निवडणूकीनंतर सोनगीरचा पाणी प्रश्न सोडवू अशी सुचना आयुक्त …

अधिक वाचा

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपा सुरुंग लावणार का?

राहुल जगताप (धुळे)- खान्देशात धुळे जिल्हा हा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. जिल्ह्यातील पाच पैकी तीन आमदार हे काँग्रेसचे आहेत. जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे तर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेसचे मातब्बर उमेदवार आ.अमरीश पटेल यांचा पराभव केल्याने काँग्रेसच्या अभेद किल्ल्यास पहिला …

अधिक वाचा

धुळे मनपा निवडणूक:राष्ट्रवादीच्या इच्छुकांना जागा वाटपाची प्रतीक्षा

उद्या उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता धुळे- महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने 19 प्रभागातील 73 जागांसाठी 195 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहे. दरम्यान दिवाळीनंतर योग्य उमेदवारांची निवड व जागा वाटपाचा निर्णय पक्षांची घेतल्यामुळे आता इच्दुक उमेदवारांनी उमेदवारीची प्रतिक्षा लागली आहे. उद्या मंगळवारी उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. शहरातील कमलाबाई कन्या विद्यालयासमोर राष्ट्रवादी …

अधिक वाचा

धुळे मनपा निवडणूक: आरओ कार्यालयांवर सीसीटीव्हींची नजर

धुळे- महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून कार्यान्वित झालेल्या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आरओ कार्यालयांमध्ये एकूण 36 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक होणार्‍या प्रत्येक हालचालीवर सीसीटिव्हीचा वॉच असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सहा निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र दालन कार्यान्वित करण्यात आले असून …

अधिक वाचा

धुळे मनपा निवडणूक: राजकीय पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी सादर होईना

धुळे- महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने स्टार प्रचारकांची यादी महापालिकेला सादर करावी अशा सूचना आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सुधारक देशमुख यांनी दिल्या होत्या. मात्र एकही पक्षाकडून यादी सादर केलेली नाही. महापालिका निवडणूकीत प्रचारासाठी वेगवेगळ्या स्टार प्रचारकांचा वापर विविध राजकीय पक्षांकडून केला जातो. मोठ्या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेते …

अधिक वाचा

भाजप आमदार अनिल गोटे राजीनामा देणार

धुळे : सध्या धुळे महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपमध्ये धुळ्यात अंतर्गत कलह आहे हे पुन्हा उघड झाले आहे. दरम्यान धुळ्याचे भाजपा आमदार अनिल गोटे आमदारकीचा १९ नोव्हेंबर रोजी राजीनामा देणार आहेत. महापालिका निवडणुकीत स्वत: महापौरपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शनिवारच्या …

अधिक वाचा

दिवाळीच्या सुटीत गावी परतणार्‍या विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात ; पित्यासह चिमुरडी ठार

चौघे गंभीर ; छडवेल पखरूण गावाजवळील घटना ; भरधाव वाहनाने हुलकावणी दिल्याने वाहन उलटले साक्री- दिवाळीच्या सुटीनिमित्त गावाकडे परतणार्‍या विद्यार्थ्यांच्या महिंद्रा जीपला ा समोरून भरधाव आलेल्या वाहनाने हुलकावणी दिल्याने वाहन उलटून पिता-पूत्रीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सुरत-नागपुर महामार्गावरील छडवेल पखरूण गावाजवळ शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दीपाली …

अधिक वाचा

पारोळा उपकोषागार अधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात

भविष्य निर्वाह निधीची रक्कम वर्ग करण्यासाठी एक हजारांची स्वीकारली लाच पारोळा- पारोळा उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार अधिकारी शिवदास हंसराज नाईक (50) यांना एक हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयात सोमवारी दुपारी तीन वाजता अटक केली. तक्रारदाराला मंजूर झालेली भविष्य निर्वाह निधीची 80 हजारांची रक्कम वनक्षेत्रपाल यांच्या शासकीय खात्यात …

अधिक वाचा

धुळे अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती

भुसावळ- धुळ्यातील अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या बदलीला औरगांबाद मॅटमध्ये आव्हान दिल्यानंतर स्थगिती देण्यात आली आहे. पानसरे यांनी गेल्या काही महिन्यांच्या काळातच शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवत अवैध धंद्यांवरही धडक कारवाई केल्याने शहरवासीयांमधून त्यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त होत होते मात्र दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 17 रोजी राज्याचे गृह विभागाचे उपसचिव कैलास …

अधिक वाचा
error: Content is protected !!