Tuesday , October 16 2018
Breaking News

जळगाव

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिममित्त मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या

रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार : लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन भुसावळ- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी पाहता गैरसोय टळण्यासाठी मुंबई-नागपूर व नागपूर-पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशा आहेत विशेष रेल्वे गाड्या 18 ऑक्टोबर …

अधिक वाचा

मुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

मुक्ताईनगर- 2018 मध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशी, तूर, ज्वारी मका व सोयाबीन हे लागवडीखालील क्षेत्र असून हंगामात पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्यामुळे उन्हामुळे पिके करपली आहेत. शेतकरी चिंतेत असल्याने मुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजारांची …

अधिक वाचा

भंगार चोरणारी जळगावातील चोरट्यांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

वाघूर डॅमवरून लांबवले दिड लाखांचे व्हॉल्व्ह ; भंगारच्या विल्हेवाटीनंतर शहरात होता दरोड्याचा डाव भुसावळ- भंगार चोरून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आलेल्या टोळीचा बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमीयरजवळ मुसक्या आवळल्या. आरोपी भंगारची विल्हेवाट लावल्यानंतर शहरातील विकास कॉलनीत दरोडा टाकणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सचिन दशरथ दोळे (26, रा.दिनकर …

अधिक वाचा

मित्राचा वाढदिवस साजरा करून परतणारे दोघे तरुण किनगावजवळ अपघातात ठार

यावल- तालुक्यातील किनगाव येथे ट्रकने दुचाकीला कट मारून झालेल्या अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. किनगाव खुर्द गावातील तरुण आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावाबाहेरील हॉटेलमध्ये तरुणे गेले होते. रात्री 10.30 वाजता दुचाकीवर (एम.एच.19-सीबी.3597) जितेश ओंकार कोळी व महेश दिलीप कोळी (वय 24) …

अधिक वाचा

रेंभोटाचा व्यावसायीक तरुण अपघातात जागीच ठार

रावेर- तालुक्यातील रेंभोटा येथील रहिवासी तथा रावेरातील व्यावसायीक ऋषीकेश उर्फ टिपू ब्रिजलाल कोळी (वय 25) हे विवरे येथून काम आटोपून रावेरकडे जात होते. रविवारी रात्री विवरे जवळील पारसे पुलालगत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ऋषिकेश यांचा …

अधिक वाचा

यावल पंचायत समितीच्या सभेला विरोधक, सत्ताधार्‍यांचा बहिष्कार

यावल- पंचायत समितीच्या सोमवारी झालेल्या मासिक सभेत यापूर्वीच्या सभेच्या इतिवृत्तात खोटा मजकूर लिहिल्याचे समोर आले. या कारणावरून विरोधकांनी सभेवर बहिष्कार टाकला. सत्ताधार्‍यांनी देखील सभात्याग केला. सोमवारी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, 19 सप्टेंबरच्या मागील मासिक सभेत ऐनवेळी काही विषय मांडण्यात आले होते. त्यावर 144, 145, 146 व …

अधिक वाचा

वरणगावात वीटभट्टी व्यावसायिकाचा दगड-वीटांनी ठेचून खून

अज्ञात मारेकरी पसार ; आर्थिक कारणातून घटनेचा प्राथमिक अंदाज वरणगाव- शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी तथा वीटभट्टी व्यावसायीक सुनील ओंकार चौधरी (50) यांचा दगड-विटांनी ठेचून खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून यामागे आर्थिक कारण असल्याचा प्राथमिक अंदाज …

अधिक वाचा

कोल्हेनगरात शेतकर्‍याच्या बंद घरात चोरी

कुलूप तोडून 85 हजारांचा मुद्देमाल लंपास; पोलीसात गुन्हा जळगाव – शहरातील कोल्हेनगर परिसरातील शेतकर्‍याच्या घरात डल्ला मारून चोरट्यांनी 87 हजार 500 रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेबाबत तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरवाज्याचे कुलूप तोडून केला घरात प्रवेश सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, …

अधिक वाचा

जिल्ह्यातील अवैध धंदे पुर्णपणे बंद करा

* पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांचे आदेश * आदेशाचे पालन न केल्यास होणार कारवाई * जो अधिकारी कर्तव्यात कसुर करेल त्याचे वेतन वाढ रोखण्याचा दिला इशारा जळगाव – जिल्ह्यात सुरु असलेले अवैध धंदे पुर्णपणे बंद करा असा आदेश पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी 15 ऑक्टोंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील …

अधिक वाचा

मारहाणीत तरुणाचा मृत्यूप्रकरणी 10 वर्षाची शिक्षा

जळगाव – जामनेर तालुक्यातील कापुसवाडी येथे जागेच्या वादावरून गैरकायद्याची मंडळी जमवून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जामनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू गुन्ह्यातील संशयिताचा खुनाचा उद्देश नसल्याने सहा संशयितांना न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून प्रत्येकी १० वर्ष …

अधिक वाचा
error: Content is protected !!