Tuesday , June 19 2018
Breaking News

भुसावळ

समाजकंटकांनी दगड-गोटे टाकून बुजली कुपनलिका

जि.प.सदस्यांची तक्रार ; जोगलखेडासह भानखेडा गावाचा पाणीपुरवठा प्रभावीत भुसावळ- तालुक्यातील जोगलखेडासह भानखेडा या गावांना पाणीपुरवठा करणार्‍या बोअरवेलमध्ये समाजकंटकांनी दगडगोटे टाकून ती बुजवण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांची तब्बल 15 दिवसांपासून भटकंती सुरू आहे. या संदर्भात जिल्हा परीषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी …

अधिक वाचा

नंदुरबारात तरुणांच्या दोन गटात हाणामारी ; दोन तरुण जखमी

वाहनांचे प्रचंड नुकसान ; उद्यानात आलेल्यांची पळापळ नंदुरबार- शहरातील सी.बी.गार्डनमध्ये तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यावेळी वाहनांचेदेखील नुकसान करण्यात आले आहे. हाणामारीत दोन तरुण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे विरगुळ्यासाठी गार्डनमध्ये फिरायला येणार्‍या महिला व नागरीकांमध्ये भीती पसरली होती. गार्डनमधील कर्मचारी व फिरायला येणार्‍या तरुणांमध्ये …

अधिक वाचा

यावलच्या वृद्धाने केले उंदीर मारण्याचे औषध प्राशन ; उपचारादरम्यान मृत्यू

यावल- शहरातील 63 वर्षीय वृद्धाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 16 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा मृत्यू झाल्याने जिल्हा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करून ती यावल पोलिसात वर्ग करण्यात आली. गंगाराम सावळा शिंदे (63, रा.शिवाजी नगर, यावल) असे मृत …

अधिक वाचा

शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी रावेरमध्ये पीआरपीतर्फे रेल रोको आंदोलन

काशी एक्स्प्रेससमोर जोरदार घोषणाबाजी ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त रावेर (प्रतिनिधी)- वादळग्रस्त केळी उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, जळगाव व वाकडीच्या दोषी आरोपींना शिक्षा व्हावी, सचखंड, महानगरी एक्सप्रेस गाड्यांना रावेर येथे थांबा द्यावा, फैजपूरच्या गरीबांना घरकुल द्यावे आदी मागण्यांसाठी सोमवारी दुपारी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांतर्फे …

अधिक वाचा

नगरपालिकेच्या योजना गरजुपर्यंत पोहोचणार

रावेर पालिकेची नूतन मुख्यधिकारी रवींद्र लांडे यांची ग्वाही रावेर (प्रतिनिधी)- रावेर नगर पालिकेची हद्दवाढ करणार असून स्वच्छ सर्वेक्षणाला गती देण्यासह शहरातील गजरूंना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल देण्यात येईल व कर्मचारी संख्याबळ वाढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाणार असल्याची ग्वाही नूतन मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली. …

अधिक वाचा

भारताच्या एकतेचे दर्शन साकळीत दिसून येते -डॉ.उल्हास पाटील

साकळीत एकता फाऊंडेशनतर्फे ईद मिलन कार्यक्रम यावल- तालुक्यातील साकळीत नेहमीच धार्मिक एकतेचे दर्शन विविध उपक्रमातून घडते. या माध्यमातूनच गावातील सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. म्हणूनच साकळी गाव सर्व-धर्म एकतेचे प्रतीक बनले असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले. साकळी येथील एकता फाउंडेशनच्या वतीने पवित्र रमजाननिमित्त ईद मिलनाचा कार्यक्रम सोमवार, …

अधिक वाचा

श्री संत मुक्ताई पांडुरंगाच्या भेटीला

मुक्ताई पादुकाचे पालखीचे प्रस्थान ; यंदा निर्मल वारी हरित वारी मुक्ताईनगर- श्री संत मुक्ताई पादुकांचे पालखीसह श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर येथुन सोमवारी पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान झाले. या भक्तिमय सोहळ्याप्रसंगी माजी महसूल मंत्री मुक्ताई एकनाथराव खडसे, महानंद मुंबईच्या अध्यक्षा मंदा खडसे, अ‍ॅड.रविंद्रभैय्या पाटील, जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन, पंचायत …

अधिक वाचा

स्वच्छ भारत अभियानाला सर्वोच्च प्राधान्य

फैजपूरचे नूतन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची ग्वाही फैजपूर (प्रतिनिधी)- फैजपूर शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. शहराची ओळख जशी काँग्रेसच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनमुळे निर्माण झाली तसे शहराचे सौंदर्यदेखील सुंदर असले पाहिजे हेच ध्येय मनाशी बाळगून फैजपूर शहर स्वच्छतेकडे नेण्याचा माझा मानस असल्याचे नूतन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी …

अधिक वाचा

किनगाव अपहार प्रकरणी ; पसार ग्रामविकास अधिकारी यावल पोलिसांच्या जाळ्यात

यावल- तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती महाजन यांच्यासह ग्रामविकास अधिकारी भास्कर रोकडे यांनी 2016 मध्ये 14 व्या वित्त आयोगातून गावासाठी मंजूर निधीतून तब्बल 19 लाख 25 हजार 50 रूपयांचा अपहार केला होता. यापूर्वीच सरपंचांना अटक झाली असलीतरी आरोपी ग्रामविकास अधिकारी पसार झाले होते. त्यांना रविवारी रात्री यावल पोलिसांनी अटक केली …

अधिक वाचा

भुसावळ शहराच्या विकासाला सर्वोत्तम प्राधान्य

नूतन मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांची ग्वाही ; पदभार स्वीकारला भुसावळ- पालिकेच्या मुख्याधिकारीपदी नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी सोमवार, 18 रोजी भुसावळ पालिकेत येऊन पदभार स्वीकारला. याप्रसंगी पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. भुसावळ शहराच्या विकासाला आपले प्रथम प्राधान्य राहणार असून नागरीकांना भेडसावणार्‍या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपले निश्‍चित …

अधिक वाचा
error: Content is protected !!