Sunday , January 20 2019
Breaking News

नंदुरबार

नर्मदा नदीपात्रात आणखी दोन मुलींचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ७ वर

नंदुरबार। नर्मदा नदीपात्रात आणखी दोन मुलींचे मृतदेह आढळून आले आहे. त्यामुळे बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ७ इतकी झाली आहे. मोनिका विरसिंग पावरा (वय ६), सिमर भाईदास पावरा (वय ५) राहणार तेलखेडी अशी त्यांची नावे आहेत. मकरसंक्रांती निमित्ताने नर्मदा नदीचे पूजन करण्यासाठी नर्मदा घाटातील शेकडो आदिवासी बांधव बोटीने परिक्रमा करण्याकरिता …

अधिक वाचा

नवापूर येथे अपघात; तीघे गंभीर जखमी

नवापूर – नवापूर शहराजवळील हाँटेल गार्डन समोर महामार्गावर मोटारसायकल व क्रुझर यांचा भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. याबाबत मिळालेल्या सुत्रानुसार दुपारी ४ च्या सुमारास हाँटेल गार्डन समोर (एमएच 39 जे 6848) ही क्रुझर गाडी व मोटारसायकल यांचा समोरासमोर अपघात झाला. अपघात होताच क्रुझरचालक गाडी घेवून फरार झाला आहे. …

अधिक वाचा

भूषाजवळ नर्मदेत बोट उलटली, 5 भाविकांना जलसमाधी

नंदुरबार जिल्ह्यातील घटना, 35 जण गंभीर असल्याची माहिती नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात भूषा गावापासून 15 किमी अंतरावर नर्मदा नदीत बोट उलटून 5 भाविकांना जलसमाधी मिळाली. तसेच 35 जण गंभीर अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत भूषा हे गाव शेवटचे आहे. त्यानंतर मध्य प्रदेशची हद्द लागते. घटनास्थळापासून नंदुरबार …

अधिक वाचा

पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून नंदुरबार जिल्ह्यात युवकाची हत्या !

नंदुरबार-पैशांच्या देवाणघेवाणीवरून तरुणाचा खून झाल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव गावात घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैशांच्या देवाणघेवाण या कारणावरून छोटुराम सुनील वळवी (२०) वर्ष या तरुणास पाच जणांनी लाठ्याकाठ्यांनी व लोखंडी बाकने …

अधिक वाचा

शहादा शहरात मतीमंद मुलीवर तीन तरुणांकडून बलात्कार !

शहादा-शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर ३ तरुणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या तीन नराधमांनी केलेल्या कृत्याचा निषेध केला जात आहे. एका १६ वर्षाच्या मतीमंद मुलीचा गैरफायदा घेत ३ तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस …

अधिक वाचा

नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील शेतात बिबट्याचा धुमाकूळ !

नंदुरबार। काठोबा देवस्थान परिसरातील शेतांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याने शेतकऱ्यांमधे कमालीची भीती निर्माण झाली आहे. या बिबट्याने ठेलारी कुटुंबीयांचा एका घोड्याचा फडश्या पाडला आहे. नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील काठोबा देवाच्या टेकडी परिसरात बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी भयभीत झाले असून धुमाकूळ घालून प्राण्यांना भक्ष्य करणाऱ्या बिबट्या चा …

अधिक वाचा

आगामी लोकसभेचे तिकीट मलाच मिळणार; खासदार हिना गावित यांचा दावा

नंदुरबार। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे आमची उमेदवारी निश्चित आहे असा दावा करत आम्ही आता पासूनच तयारीला लागलो आहे, तसा प्रचार देखील सुरू केला आहे असे स्पष्टीकरण खासदर हिना गावीत व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले. नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. खासदार …

अधिक वाचा

शासकीय टंकलेखन परीक्षेवर खाजगी संगणक चालकांचे नियंत्रण; नंदुरबारमधील प्रकार

नंदुबार-येथे सुरू असलेल्या शासकीय संगणक टायपिंग परीक्षेचा ताबा संगणक चालकांनी घेतल्याने या परीक्षा प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. खाजगी संगणक संचालक आपल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी धडपड करतांना दिसून आले आहे. पहिल्या सत्रातील परीक्षेत माध्यमिक शिक्षण विभागातील एकही अधिकारी परीक्षा केंद्रांकडे न फिरकल्याने शासकीय नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या संगणक परीक्षेवर नियंत्रण …

अधिक वाचा

अनधिकृत दारू विक्री करणाऱ्यावर कारवाईची मागणी

नंदुरबार : शहरातील परवानाधारक व विनापरवानाधारक दारू विक्रेत्यांचा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. परवानाधारक बियर बार चालकांनी अनधिकृत दारू विक्री करणाऱ्या बिअर शॉपी, ढाबे, सोडा बाटली हातगाडी, हॉटेल यांच्या विरुद्ध वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नंदुरबार मधील बहुचर्चित दारूचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला …

अधिक वाचा

महावितरणच्या चुकांचा ग्राहकांना जबरदस्त भूर्दंड

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांचा आरोप जळगाव – महावितरण आपली चूक मान्य करत नाही, चोरी आणि भ्रष्टाचार थांबविण्यात ते अपयशी ठरले असून, त्याचा भुर्दंड व्यावसायिकांना पडत आहे असा गंभीर आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी जळगाव येथे उद्योजकांच्या बैठकीत केला. प्रतापराव होगाडे यांनी मार्गदर्शन …

अधिक वाचा
error: Content is protected !!