Tuesday , June 19 2018
Breaking News

महामुंबई

2014 च्या राजकीय अपघाताची 2019ला पुनरावृत्ती होणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : 2014 चा राजकीय अपघात 2019 सालात होणार नाही, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ‘शिवसेनेचा मार्ग सरळसोट कधीच नव्हता. आजही नाही. शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे असंख्य डोंगर आहेतच. ते आपण ओलांडले की त्याच डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील. महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल …

अधिक वाचा

पहिली घटनादुरुस्ती शेतकऱ्यांना पारतंत्र्यात घालणारी!

शेतकरी पारतंत्र्य दिवसानिमित्त किसानपुत्र आंदोलनच्या वतीने कार्यक्रम मुंबई:- 18 जून 1951 रोजी पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली होती. ही घटना दुरुस्ती शेतकऱ्यांना पारतंत्र्यात घालणारी होती. या घटनादुरुस्तीमध्ये कलम 31-B चा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर अनेक कायदे क्रूर कायदे थोपविण्यात आले आहेत, या विरोधात सनदशीर मार्गाने सर्वोच्च न्यायालयात आवाहन …

अधिक वाचा

आचारसंहिता लागण्यापूर्वी समाजाला आरक्षण द्या!

मुंबई । लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण लागू करावे, अशी मागणी धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे तसेच चौंडी येथे धनगर समाजातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. धनगर समाजातील तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी धनगर …

अधिक वाचा

देशात हम करे सो कायदा ही स्थिती!

मुंबई । राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘संविधान वाचवा, देश वाचवा’, या सुरू करण्यात आलेल्या अभियानांतर्गत 20 जून 2018 रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संविधान बचाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. आजवर आपला देश समता, बंधुत्व, …

अधिक वाचा

नायरमधील दुर्घटनाग्रस्त एमआरआय मशीनच्या दुरुस्तीसाठी कोटींचा खर्च

मुंबई । नायर रुग्णालयात 28 जानेवारी रोजी एमआरआय मशीन दुर्घटनेत राजेश मारू या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे ही एमआरआय मशीन तेव्हापासून बंद पडली असून, त्यामुळे रुग्णांना या मशीनचा लाभ मिळत नाही. आता या मशीनच्या दुरुस्तीसाठी आता 1.53 कोटी रुपये खर्च येणार आहे. यासंदर्भातील, प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी …

अधिक वाचा

अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था काम करणार विकासासाठी

पेण । आगरी समाजाचा सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीयस्तरावर विषेश प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेण येथे पत्रकारपरिषदेत दिली.आगरी समाजाची लोकसंख्या ही दोन ते अडीच कोटींच्या आसपास असून रायगड, ठाणे, मुंबईच नव्हे तर बुलडाणा, नाशिकमध्येदेखील या समाजाची वस्ती आहे. सूरतमध्ये तर …

अधिक वाचा

लक्षवेधीद्वारे धनंजय मुंडे धारेवर धरणार सरकारला

मुंबई । राज्य शासनाने पहिल्यांदाच स्थापन केलेल्या महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काउंसिलमधील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या चुकीच्या पद्धतीने झाल्या असून, त्याची नि:पक्षपातीपणे चौकशी करून, तत्काळ काउन्सिल बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र, अद्याप कारवाई न झाल्यामुळे येत्या पावसाळी …

अधिक वाचा

अनोखे शिबिर : भरपावसात छत्र्यांवर उमटल्या रंगछटांसह शायरी

मुंबई । लहान मुलांमधील चित्रकलेच्या उपजत कलेचा विकास होण्यासाठी घाटकोपरच्या भटवाडीमध्ये अनोखी आपली छत्री आपणच रंगवा हे शिबिर घेण्यात आले. या स्पर्धेत छत्री रंगवताना मुले आनंदाने हरखून गेली. भरपावसात आपली छत्री अनोख्या पद्धतीने रंगवण्याची मजा वेगळीच असते. हा अनुभव लहान मुलांसह अनेकांनी घेतला. पावसाळ्यात आकर्षक आणि वेगळी छत्री आपण प्रत्येकजण …

अधिक वाचा

मुंबई मेट्रो 3 च्या भुयाराचे काम पूर्ण

मुंबई । मेेट्रो 3 च्या भुयारी मार्गाच्या कामाने आता जोर धरला आहे. मेट्रो 3 अंतर्गत येणार्‍या सीएसएमटी ते मुंबई सेंट्रलदरम्यान रेल्वेकडून नुकतेच एका भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. याबाबतचा व्हिडिओ मुंबई मेट्रो 3 ने ट्वीट केला आहे तसेच टनेल बोरिंग मशीन्सच्या (टीबीएम्स) साहाय्याने या भुयाराचे काम पूर्ण करण्यात आले …

अधिक वाचा

नजिब मुल्ला यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मैदानात!

नवी मुंबई । कोकण पदवीधर मतदारसंघातील लोकशाही आघाडीचे उमेदवार नजिब मुल्ला या निवडणुकीत जिंकून आमदार बनतील, असा विश्‍वास लोकनेते गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष आणि आरपीआय (कवाडे गट) लोकशाही आघाडीचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार नजिब मुल्ला यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची …

अधिक वाचा
error: Content is protected !!