Sunday , September 23 2018
Breaking News

नवी मुंबई

लालबागच्या राज्याच्या दरबारात हाणामारी; पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

मुंबई – मुंबईत प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी मुजोरी करत राजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. हा संतापजनक प्रकार आज घडला आहे. स्थानिक रहिवाशी आणि कार्यकर्ते हे रांगेशिवाय आपल्या ओळखीच्या व्यक्तींना थेट स्टेजवर चढून चरणस्पर्श घेण्यासाठी बाप्पाच्या समोरून एक मार्ग खुला ठेवण्यात …

अधिक वाचा

मल्ल्याला अटक न करता आम्हाला गुपचूप कळवा; सीबीआयचे मुंबई पोलिसांना खळबळजनक पत्र

मुंबई-मुंबई पोलिसांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अटक करू नये, तो देशात आल्यावर आम्हाला गुपचूप पद्धतीने कळवावे असे आदेश सीबीआयकडून देण्यात आले होते, असा धक्कादायक माहिती समोर आली आहे. मल्ल्याला ताब्यात घेण्याची गरज नाही, पण तो भारतात आल्यावर आम्हाला गुपचूप माहिती द्या असे आदेश सीबीआयकडून मुंबई पोलिसांना पत्राद्वारे देण्यात आले होते. यापूर्वी …

अधिक वाचा

फडणवीसांच्या नेतृत्वात ४ वर्षांत राज्य आर्थिक दिवाळखोरीकडे-जयंत पाटील

पंधराव्या वित्त आयोगाच्या राज्य भेटी बद्दल व वित्त आयोगाने राज्य सरकारवर ओढलेल्या ताशेऱ्यांवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया मुंबई: पुढील २ दिवस पंधरावा वित्त आयोग राज्याच्या भेटीवर येत असून, या भेटीपूर्वीच वित्त आयोगाने आर्थिक बेशिस्तीबद्दल राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. आघाडी सरकारच्या काळात  राज्याचे जे महसूली उत्पन्न १७.३%  होते ते …

अधिक वाचा

लोकशाहीत टीका होत असते;संजय निरुपम वक्तव्यावर ठाम

मुंबई- मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अशिक्षित, अडाणी अशा शब्दांचा वापर करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. मात्र, निरूपम आपल्या विधानावर ठाम आहेत आणि आपल्या विधानात काहीही चुकीचे नसल्याचे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीत पंतप्रधान हा देव नसतो. लोकशाहीत पंतप्रधानांवर टीका …

अधिक वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी अडाणी; संजय निरुपम यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई – आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपाच्या धोरणांवर हल्लाबोल चढवताना संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अशिक्षित-अडाणी असा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘चलो …

अधिक वाचा

महागाईच्या डायनाला नष्ट कर; उद्धव ठाकरे यांची गणरायाकडे प्रार्थना

मुंबई- आज देशभरात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशभक्त आज आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करत असून त्याच्याकडे प्रार्थना करत आहेत. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील गणरायाला साकदे घातले आहे. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असून ‘महागाईच्या डायनाला’ नष्ट करण्याची प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी गणरायाकडे केली आहे. बुद्धीची …

अधिक वाचा

चिपी विमानतळावरून राणे, केसरकर यांच्यात वाकयुद्ध

सिंधुदूर्ग- सिंधुदूर्गातील चिपी विमानतळावर पहिले विमान आज उतरले. विमान उतरून काही तासही झालेले नाहीत तोवर यावरून राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. विमानतळासाठी डीजीसीएची परवानगी नसतानाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी चिपी विमानतळावर विमान उतरवल्याचा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. परंतु, केसरकर यांनी राणेंचा आरोप फेटाळला असून डीजीसीएने परवानगी दिल्यानंतरच …

अधिक वाचा

मुंबई मेट्रोच्या नवीन मार्गाच्या विस्तारीकरणाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठक

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील अनेक प्रश्न निकाली लावण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबईमेट्रोच्याही नवीन मार्गांच्या विस्ताराला मान्यता देण्यात आली. त्यानुसार मुंबई मेट्रो 9, मुंबई मेट्रो 7 म्हणजेच मेट्रो 7 महामार्गाच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

अधिक वाचा

गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई – गोवा महामार्गावर लांजा तालुक्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिलांचा समावेश असून आणखी तीन जण या अपघातात जखमी झाले आहेत. कारमधील प्रवासी हे सिंधुदुर्गच्या दिशेने जात होते. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त कारने सिंधुदुर्गातील …

अधिक वाचा

भाजपला हिंदुत्वाचा विसर पडला-शिवसेना

मुंबई- हिंदुत्वाच्या मुद्दयांवर निवडणूक लढवून भाजप सत्तेत आला आहे. मात्र सत्ता मिळविल्यानंतर भाजपला हिंदुत्वाचा विसर पडला आहे असे आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सत्तेत आल्यानंतर राम मंदिर बांधण्याचे आश्वासन भाजपने दिले होते मात्र ते अद्याप पूर्ण केलेले नाही असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. BJP too was …

अधिक वाचा
error: Content is protected !!