Tuesday , June 19 2018
Breaking News

ठाणे

मुसळधार पावसाने झाड पडून 6 गाड्यांचे नुकसान

ठाणे । गेल्या काही दिवसांपासून उसंती घेतल्यानंतर काल रात्री पुन्हा पावसाने जोर धरला. ठाण्यात गेल्या 24 तासात 47.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे झाड कोसळून एकूण 6 गाड्यांचे नुकसान झाले आहे. मात्र यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ठाण्यात शनिवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे पाच चारचाकी गाड्यांवर झाड कोसळून …

अधिक वाचा

बांगलादेशी जोडप्यासह त्रिकुट ठरले दोषी

ठाणे । बांगलादेशातून मुलींना आणून त्यांच्याकडून काही जण वेश्याव्यवसाय करून घेत होते. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. खलिपे यांनी साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरत पिटा अंतर्गत एका बांगलादेशी जोडप्यासह त्रिकुटाला दोषी ठरवले आहे. दोषी त्रिकुटाला 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि 26 हजाराचा प्रत्येकी दंड अशी शिक्षा ठोठावली. …

अधिक वाचा

आत जाण्यासाठी रूग्णांना वळसा मारावा लागतो

उल्हासनगर । उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या गेटला रुग्णालय प्रशासनाने टाळे लावल्याने गेटमधून येणार्‍या रूग्णांना तसेच गेटलगतच असणार्‍या मंदीरात येणार्‍या जाणार्‍या भाविकांना गेट बंद असल्यामुळे लांबचा पल्ला गाठून रूग्णालयाच्या प्रवेशद्वारातून यावे लागत असल्याने रुग्ण आणि स्थानिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे. उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. 3 परिसरात मध्यवर्ती शासकीय रूग्णालय …

अधिक वाचा

बेकरीला आग लागून छताचा स्लॅब कोसळला भट्टीवर

ठाणे । राबोडीतील पाव बेकरीला शनिवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. यातच छताचा स्लॅब हा भट्टीवर कोसळला. पण, सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले. त्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा नि: श्‍वास सोडला. ठाण्याच्या राबोडी परिसरातील अहमद चाळीमध्ये शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या …

अधिक वाचा

मुरबाड माळशेज घाटातील प्रवास ठरतो आहे जीवघेणा

मुरबाड । मुरबाड तालुक्यामधील दुर्गम भागातील काही नागरिक रोजगारा साठी घाटमाथ्यावर आळेफाटा, ओतुर, बनकरफाटा येथे जातात. मात्र या प्रवासासाठी बसचा खर्च परवड नसल्याने या मार्गावर नित्य चालणार्‍या काही मालवाहू गाडयामधून हे प्रवासी प्रवास करत आहेत. माळशेज घाट रस्त्यावर वारंवर अपघात होत असताना रोजगारासाठी रोज जिवावर उदार होत प्रवास करतात. या …

अधिक वाचा

कल्याण डोंबिवलीत कचरा उचलण्यात खेळखंडोबा

कल्याण। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचरा उचलण्यातील खेळखंडोब्याला कारणीभूत ठरलेल्या कचरावाहू वाहनांच्या दुरुस्तीमधील सावळा गोंधळ सत्ताधारी शिवसेनेच्या सभागृहनेत्यांनी उघडकीस आणला आहे. पालिकेच्या डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील वाहनदुरुस्ती आगाराला सेनेच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या अचानक भेटीत तेथे अधिकारी-कर्मचार्‍यांची अनुपस्थिती, दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कचरावाहू वाहने, वाहनांच्या नोंदी नसणे असे प्रकार आढळून आले. विशेष म्हणजे …

अधिक वाचा

वादग्रस्त अधिकार्‍यावर गुन्हा नोंदवण्यासाठी आंदोलन

उल्हासनगर । उल्हासनगर महापालिकेचे वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कार्यालयात मिळालेल्या फाइल्स, कोरे धनादेश आणि इतर कागदपत्रे सापडूनही महापालिका आयुक्त गणेश पाटील भदाणे यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. आयुक्तांच्या या भूमिकेविरोधात शहरातील जागरुक नागरिक, व्यावसायिक व काही समाजसेवी संस्थांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर मूक निर्देशने करून भदाणे यांच्यावर गुन्हा दाखल करून …

अधिक वाचा

टोकावडे पोलीस स्थानकाला आयएसओ मानांकन

मुरबाड । ठाणे जिल्ह्यातील टोकावडे पोलीस ठाण्याची स्थापना होऊन कमी कालावधीत विविध सोईसुविधा निर्माण करण्यासोबतच, घडलेल्या गुन्ह्यांची जलद गतीने उकल तसेच गुन्हा सिद्ध करण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न, वायफाय सेवा, पोलीस ठाण्यात संगणकीय कामकाज आदी गोष्टींची दखल घेतया पोलिस ठाण्याला आयएसओ मानांकन देण्यात आले आहे. कल्याणनगर राष्ट्रीय महामार्गावरील टोकावडे हे महत्त्वाचे …

अधिक वाचा

पुन्हा शिवसेना कार्यकर्त्याला भाजपच्या पदाधिकार्‍याकडून मारहाण

कल्याण । महापालिकेत सामील करण्यात आलेल्या 27 गावांचा पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून, आता पाणीप्रश्‍नी या गावामध्ये राडे सुरू झाले आहेत. पाण्यावरून डोंबिवलीतील भोपर येथे भाजप पदाधिकार्‍याने शिवसेनेच्या कार्यकर्त्याला ठोशा बुक्क्याने मारहाण केली असून, याबाबत मानपाडा पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डोंबिवलीनजीक असलेल्या भोपर गावात पाणीप्रश्‍न गंभीर बनला …

अधिक वाचा

आत्महत्येला नवे वळण

कल्याण । कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला (56) यांनी तीन महिन्यांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती. मृत झोजवाला यांना सिडकोचे चेअरमनपद देण्याचे आमिष दाखवून दोघांनी 7 कोटी रुपयांना गंडा घातला होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. संजय …

अधिक वाचा
error: Content is protected !!