Monday , July 23 2018

ठाणे

अखेर कॅडबरी मंत्रालय बस बंद

ठाणे । ठाणे महापालिका परिवहन सेवची ठाण्यातून मुंबईला जाण्यासाठी सुरू केलेली ठाणे मंत्रालय ही बससेवा अखेर बंद झाली. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च व पुरेसे प्रवासी नसल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी केलेल्या मागणीनंतर हा निर्णय होईल. त्यामुळे आता ठाणेकरांना मुंबईला जाण्यासाठी बेस्टच्या बसेसवर अवलंबून राहावे लागणार …

अधिक वाचा

राज्यातील 12 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई । शेतकरी कर्जमाफी वितरणप्रणालीवरून सहकार विभाग टीकेचा धनी ठरल्याने या विभागाचे सचिव व्ही. के. गौतम यांची बदली वित्त विभागात करण्यात आली. त्यास काही महिन्याचा अवधी लोटत नाही. तोच गौतम यांची पुन्हा दुसर्‍यांदा बदली करत त्यांची नियुक्ती पर्यटन व सांस्कृतिक खात्याच्या प्रधान सचिव पदी राज्य सरकारने केली आहे. गौतम यांच्यासह …

अधिक वाचा

मुरबाड अहमदनगर रेल्वेचा उल्लेखच नाही

मुरबाड (बाळासाहेब भालेराव)। मुरबाड- नगर रेल्वेचे घोंगडे गेली 20 ते 25 वर्षे धूळ खात पडले आहे. राज्याच्या अनेक कोपर्‍यांमध्ये रेल्वे सेवा पोहोचली आहे. मुरबाड परिसरातील नोकरदार वर्ग, व्यावसायिक, शेतमालाचे व्यापारी इत्यादींसाठी रेल्वे होणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी 2016 मध्ये आर्थिक संकल्प सादर करत असताना तत्कालीन अर्थ मंत्री सुरेश प्रभू …

अधिक वाचा

आता 90 वर्षीय सावित्रीबाईंनी दिला आत्महत्येचा इशारा

ठाणे । सध्या धर्मा पाटील आत्महत्याप्रकरण चांगलेच गाजत आहे. त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला इतर शेतकर्‍यांचा विरोध असूनही 90 वर्षाच्या सावित्रीबाई कदम या आजीबाईंनी जमिनीचे खरेदीखत शासनाच्या नावे करून दिले. मात्र, त्यांना मोबदल्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे हतबल झालेल्या आजीबाईंनी आत्महत्येचा …

अधिक वाचा

ठाणे काँग्रेसचे अभिनव आंदोलन

ठाणे । केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या विरोधात असल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या निषेधार्थ ठाणे शहर काँग्रेस कमिटीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. ठाण्यातील काँग्रेस कार्यलयातून निघालेल्या या मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चारचाकी गाडी रस्सीने खेचून तसेच दुचाक्या रस्त्यावर ढकलत नेऊन सरकारचा निषेध केला. …

अधिक वाचा

उल्हासनगरमध्ये उद्यानांमध्ये उभारणार वर्मी खत प्रकल्प

उल्हासनगर । उल्हासनगर महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडची मर्यादा संपल्याने महापालिकेच्या उद्यानांमध्ये ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी वर्मी व बीओ सॅनिटायसरवर आधारित प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी घेतला आहे. यामुळे डम्पिंगवर कचरा जळल्यामुळे होणारी धुराची समस्या ही सुटणार आहे. उल्हासनगर महापालिकेच्या म्हारळ गाव येथील डम्पिंग ग्राऊंडची मर्यादा संपल्याने ते वर्षभरपूर्वी …

अधिक वाचा

विजेच्या धक्क्याने वासिंदमध्ये तरुण जखमी

वासिंद । केवळ नशीब बलवत्तर म्हणून शुक्रवारी वासिंदमध्ये एक तरुण जीवघेण्या अपघातातून बचावला. अतुल रामचंद्र बिडवी (वय 42 वर्षे) असे या तरुणाचे नाव असून तो घरोघरी दुधाच्या पिशव्या पोहोचवतो. सकाळी आठ वाजताच्या सुमारास वासिंद पूर्व भागात आपल्या दुचाकीवरून दूध वाटपासाठी जात असता अचानक पणे रायकरपाडा विभागात विद्युत खांबावरील वीजवाहक तार …

अधिक वाचा

जाब विचारला म्हणून तलवारी उगारल्या

कल्याणे । भरधाव वेगाने ट्रक चालवत असल्याचा एका सरदारजीला केडीएमसी बस चालकाने जाब विचारला म्हणून सरदारजी अन् ट्रकचा क्लिनर या दोघांनी चालकाला मारण्यासाठी तलवार काढल्याची थरारक घटना समोर आली आहे. या थरारक घटनेमुळे एकच खळबळ उडाली व वाहतूक कोंडी झाली होती. याप्रकरणी ट्रक चालक हरपित सिंग आणि त्याचा क्लिनर गुरपित …

अधिक वाचा

मलंग गडाच्या विकासासाठी 25 कोटी रुपये देणार

ठाणे । मलंगगड आणि परिसराचा राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून खा. डॉ. श्रीकांत शिंदे त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. एकूण 25 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येत असून मुख्यमंत्र्यांकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्याची ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

अधिक वाचा

अवघ्या 15 वर्षांच्या मुलाला मिळाली लाख मोलाच्या भूखंडाची सनद

उल्हासनगर (सुनिल इंगळे)। तब्बल 30 कोटी रूपये किंमतीच्या भूखंडाची सनद घोटाळ्यात मुख्य भूमीका बजावणार्‍या सेवलदास बिजलानी यालाा वयाच्या 15 व्या वर्षी मिळाली असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे 15 व्या वर्षाच्या अल्पवयीन असलेल्या सेवलदासला महाराष्ट्र जमीन महसूल कायद्या अंतर्गत भूखंडाची सनद मिळू शकतो का, याबाबत अनेक प्रश्‍न निर्माण झाले …

अधिक वाचा
error: Content is protected !!