Monday , July 23 2018

ठाणे

कल्याण-डोंबिवलीत वाहतूककोंडी फोडण्यासाठी सिग्नल प्रणाली

कल्याण । कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूककोंडीच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवजड वाहने, चारचाकी गाड्या, रिक्षा, दोनचाकी वाहने आणि महापालिकांच्या परिवहन सेवेच्या बसेस अशी लाखो वाहने रस्त्यांवरून धावतात. स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणार्‍या कल्याण-डोंबिवली या जुळ्या शहरातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शहरात पुन्हा सिग्नल प्रणाली उभारण्याच्या …

अधिक वाचा

कडोंमपा परिवहन बस सेवा पुन्हा चालू करा

मुरबाड । कडोंमपा प्रभाग क्रमांक 4 मधील बारावे, गोदरेज पार्क, नीरज सिटी, गोदरेज हिल, मोहन पार्क, माधव संसार, माधव संकल्प, माधव सृष्टी आणि वसंत व्हॅली या परिसरातील परिवहन बस सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीचे ठाणे पालघर विभागीय चिटणीस अशोक मिरकुटे यांनी कडोंमपाला अनेक वेळा …

अधिक वाचा

कल्याण ग्रोथ सेंटरला तत्त्वतः मंजुरी, जागेच्या किमती तीन पटीने वाढणार

ठाणे । कल्याण ग्रोथ सेंटरला आज तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. इथल्या पायाभूत सोयी सुविधांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. उद्योगाकरिता मुंबईवर अवलंबून असलेल्यांना आता दुसरा पर्याय तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी कल्याण ग्रोथ सेंटरचे कार्य कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल तसेच स्थानिक लोकांचा फायदा व्हावा यासाठी त्यांना विकासात …

अधिक वाचा

कल्याण डोंबिवलीतील फेरीवाल्यांची मुजोरी सुरुच

टिटवाळा । मस्तवाल परप्रांतीय फेरीवाल्यांनी टिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिराच्या रस्त्यावरील पदपथावर ठाण मांडले आहे. त्यांची मुजोरी वाढल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. एका परप्रांतीय फेरीवाल्या महिलेच्या दादागिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या फेरीवाला नियंत्रण पथकाने शहरातील स्टेशन रोड व मुख्य रस्त्यावरील बेकायदा फेरीवाल्यांवर दिवसाआड कारवाई …

अधिक वाचा

स्वीकृत नगरसेवक पदासाठी 12 उमेदवारी अर्ज

भिवंडी । भिवंडी निजामपूर पालिकेच्या 5 स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षीय स्तरावर मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. नगरसेवक पद मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार सुरू असून, एका सदस्यासाठी 50 लाखांची सौदेबाजी झाल्याचे बोलले जात आहे. भिवंडी महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जाची आयुक्त मनोहर …

अधिक वाचा

खिळेमुक्त झाडांसाठी कल्याणमध्ये युवकांची मोहीम

कल्याण । अंघोळीची गोळी या उपक्रमाच्या माध्यमाने पाणी बचतीचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी जागोजागी पाणी वाचवण्याचे आवाहन करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत या चार तत्त्वांवर अंघोळीची गोळी उभारलेली आहे. पाणी वाचवण्याचे ध्येय उराशी बाळगून अंघोळीची गोळी टीम मुंबई ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालये तसेच खेडोपाडी जाऊन लोकांना पाण्याचे …

अधिक वाचा

किन्हवली गावातील अवलिया हमीद शेखची वीस वर्षे फलक लेखनाची साधना

किन्हवली । किन्हवली गावातील सामाजिक कार्यकर्ते हमीद शेख (तेलीया) यांच्या किन्हवली नाक्यावरील लोकजागृतीपर फलक लेखनाला वीस वर्षे पूर्ण झाली असून, या अवलिया कलावंताने आता नवा उपक्रम हाती घेतला आहे. शेख यांनी झंडा उंचा रहे हमारा या भारताच्या ध्वजगीताला उचित सन्मान मिळावा याकरिता नागरिकांचे अभिप्राय घेऊन उपराष्ट्रपतींना निवेदन देण्याची मोहीम सुरू …

अधिक वाचा

खदानीत अंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू

ठाणे । गावाशेजारी असलेल्या खदानीतील पाण्याच्या डबक्यात अंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायत हद्दीतील दहेलेपाडा या आदिवासी वस्तीत ही घटना घडली. रोहिता रवी मांगत (वय 13), रसिका रवी मांगत (वय 12) व नीता अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलींची नावे असून त्या भिवंडीतील कांबे …

अधिक वाचा

कल्याणमध्ये होणार खान्देश भवन

कल्याण । खान्देशच्या मातीने जे मला भरभरून दान दिले आहे. त्यामुळे मी तिचा सदैव ऋणी राहीन. खान्देशाच्या आणि खान्देशी माणसांवरील प्रेमापोटी मी या महोत्सवाला उपस्थित राहिल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कल्याण येथील खान्देश फेस्टिव्हलच्या समारोपप्रसंगी बोलताना केले. यावेळी खान्देश भवनाच्या निर्मितीची संयोजकांनी मांडलेली कल्पना उचलून …

अधिक वाचा

मुरबाड तालुक्यात शेकडो जनावरांना विचित्र आजार

मुरबाड । तालुक्यातील अनेक गावांमध्ये बॉटुलिझम या विचित्र आजाराची शेकडो जनावरांना लागण झालेली असून यातील अनेक शेतक-यांच्या गाई-म्हशी दगावल्याची घटना घडली आहे. या भागातील गावोगावी जाऊन सर्व जनावरांची तपासणी करण्याची मागणी माजी उपसभापती भगवान महादेव भला यांनी जिल्हा पशुधन विभागाकडे केली आहे. ठाणे जिल्हा पशू अधिकारी प्रशांत कांबळे यांनी घटनास्थळी …

अधिक वाचा
error: Content is protected !!