Tuesday , June 19 2018
Breaking News

राष्ट्रीय

नितीश कुमारांना आपल्याकडे वळविण्यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न

पटना : काँग्रेसने पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेसने नीतीश कुमारांशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस एक प्रस्ताव दिला आहे ज्यात नितीश कुमार जर भाजपची साथ सोडतील तर काँग्रेससह इतर पक्ष त्यांना पाठिंबा देण्यासाठी विचार करेल. नीतीश कुमार यांच्याबाबतचं बिहारच्या …

अधिक वाचा

मोदींचे नीती आयोगातील भाषण अर्धसत्य

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नीती आयोगातील भाषण अर्धसत्य, लांबलचक गोष्टी व कुतर्क असलेले होते, असे आरोप काँग्रेस पक्षाने केले आहे. हेच अच्छे दिन का? असा सवालही काँग्रेसने केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे गुलाबी चित्र पंतप्रधानांनी मांडल्याचा आरोप काँग्रेसचे संपर्क प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. पंतप्रधानांनी २०१४ मध्ये …

अधिक वाचा

आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुखपदी संदीप बक्षी; चंदा कोचर यांना दणका?

मुंबई : चंदा कोचर यांच्या जागी आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुखपदी संदीप बक्षी यांच्या नियुक्ती करण्यात येणार आहे. कोचर यांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या सक्तीच्या रजेत वाढ करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सुरू आहे. व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जाबाबत कोचर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती …

अधिक वाचा

‘ग्रामीण हाट’च्या सुधारणांसाठी केंद्राकडून निधी द्या

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी नवी दिल्ली :- शेतमालाची विक्री व ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील ३ हजार ५०० ‘ग्रामीण हाट’चे नुतनीकरण व सुधारणांसाठी ॲग्रो मार्केट इन्फ्रा फंड मधून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या बैठकीत केली. राष्ट्रपती भवनात प्रधानमंत्री नरेंद्र …

अधिक वाचा

बिपिन रावत यांनी घेतली शहिदाच्या कुटुंबाची भेट!

जम्मू । लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दहशतवाद्यांकडून मारले गेलेले जवान औरंगजेब यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शिवसेनेनेही असे औरंगजेब घराघरांत जन्माला यावेत, अशा शब्दांत शहीद जवान औरंगजेब यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील शहीद औरंगजेब यांच्या घरी जाऊन रावत यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. औरंगजेब हे लष्कराच्या राष्ट्रीय …

अधिक वाचा

महिन्याला 84 रुपये द्या आणि वर्षाला 24 हजार रुपये मिळवा

नवी दिल्ली । अटल पेन्शन योजनेद्वारे आता तुम्ही महिन्याला 84 रुपये गुंतवा आणि वर्षाला 24 हजार रुपये मिळवा, असा नवा प्रस्ताव सरकारने पुढे आणला आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या एका अहवालानुसार, जर तुमचे वय 18 वर्षे आहे आणि तुम्ही महिन्याला केवळ 84 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर वयाच्या 60 वर्षांनंतर …

अधिक वाचा

वाहतूकदार संपाने भडकणार महागाई

नवी दिल्ली । देशावर पुन्हा एकदा महागाईचे संकट उभे राहणार आहे. कारण डिझेलच्या वाढत्या किमतीविरोधात वाहतूकदारांनी आजपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात देशभरातील 60 टक्के ट्रकचालक सहभागी झाले आहेत. ’सरकारचे इंधन दरवाढीवर नियंत्रण राहिले नाही. आंतरराष्ट्रीयस्तरावर दरवाढ झाल्याने इंधन दरवाढ करण्यात आल्याचे कारण सरकार देत आहे. पण केंद्र …

अधिक वाचा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची प्रकृती खालावली

नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची प्रकृती उपोषणादरम्यान खालावली असून तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. आयएएस अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात मुख्यमंत्री केजरीवाल आणि सहकारी मंत्र्यांनी उपोषण सुरू केले आहे. #Delhi Deputy CM Manish Sisodia being taken to LNGP hospital after his ketone level reached 7.4. He has been …

अधिक वाचा

मल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली-देशातील बँकांची फसवणूक करून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग तसेच बँकांना ६ हजार २७ कोटी रूपये बुडविल्या प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्राच्या आधारे न्यायालय फरार आर्थिक अपराधी अध्यादेशा अंतर्गत मल्ल्या आणि त्याच्या कंपनीची नऊ हजार कोटी रूपयांहून …

अधिक वाचा

केजरीवाल यांना शिवसेनेचा पाठिंबा

नवी दिल्ली-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नायब राज्यपालांच्या निवासस्थानातील ठिय्या सोमवारी आठव्या दिवशीही कायम आहे. गेल्या सोमवारपासून केजरीवाल आणि त्यांचे तीन मंत्री नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान, केजरीवालांच्या आंदोलनाला आता भाजपाचा सहकारी पक्ष शिवसेनेची साथ मिळताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतः अरविंद केजरीवाल …

अधिक वाचा
error: Content is protected !!