Sunday , January 20 2019
Breaking News

आज पुन्हा पेट्रोल स्वस्त; जाणून घ्या आजचे दर !

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून दररोज वाढ होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आता मागील दोन आठवड्यापासून दररोज घट होत आहे. आजही इंधनाच्या दरात पुन्हा घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात 21 पैशांनी तर डीझेल १८ पैशांनी स्वस्त झाला आहे. मुंबईत पेट्रोलसाठी आता 84.28 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलला प्रतिलिटर दर 76.88 रुपये एवढे आहेत.

नवी दिल्लीतही पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 17 पैशांनी स्वस्त झाले आहे. यामुळे येथे प्रतिलिटर पेट्रोलसाठी 78.78 रुपये, तर प्रतिलिटर डिझेलसाठी 73.36 रुपये मोजावे लागणार आहेत.

इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झाले आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

तुमच्याकडे दुसरं काम नाही का? – स्वरा भास्कर

मुंबई : स्वरा भास्करने क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांची पाठराखण केली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!