Monday , November 19 2018

पाकने हाफिज सईदच्या संघटनेला दहशतवाद्यांच्या यादीतून वगळले

इस्लामाबाद- मुंबईवरील (२६/११) हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदची दहशतवादी संघटना जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानिअत फाऊंडेशन या संघटनांना पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या अध्याधेशानुसार या संघटनांवर बंदी आणण्याबाबतचा ठराव झाला होता. मात्र, हा ठराव रद्द झाल्याने ही बंदी उठवण्यात आली आहे, असे सांगतिले जात आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी दहशतवादविरोधी कायदा, १९९७ मध्ये सुधारणा करीत जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानिअत फाऊंडेशनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. दरम्यान, इस्लामाबाद हायकोर्टात यासंदर्भात सईदने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. राष्ट्रपतींच्या अध्यादेशाचा ठराव रद्द झाल्याने आणि तो पुढे वाढवता येणार नाही, असे म्हटले आहे.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हाफिज सईद हा सुत्रधार आहे. भारताने तसे पुरावेही पाकिस्तानला सादर केले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या मागील सरकारने हाफिज सईदच्या संघटनांवर बंदी घालत सईदला नजरकैदेतही ठेवले होते. मात्र, त्यानंतर तांत्रिक कारण देत आता त्याच्या संघटनांवरील बंदी उठवण्यात आली आहे. याच वर्षी पाकिस्तानात झालेल्या सर्वत्रिक निवडणुकांमध्येही सईदच्या राजकीय पक्षाने निवडणूक लढवली होती मात्र, त्याला पाकिस्तानी जनतेने पूर्णपणे नाकारले.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

संजीवन समाधी सोहळ्यास 30 नोव्हेंबरला प्रारंभ

आळंदीत 3 डिसेंबरला कार्तिकी एकादशी आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा 723 वा संजीवन समाधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!