Tuesday , August 21 2018
Breaking News

राजकारण

आज राहुल गांधी यांनी पक्षात केले मोठे फेरबदल

नवी दिल्ली-काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद हाती घेतल्यापासून राहुल गांधी हे सातत्याने पक्षांतर्गत मोठे फेरबदल करताना दिसत आहेत. या बदलांतर्गतच त्यांनी मंगळवारी अनेक मोठ्या नेत्यांकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडे त्यांनी कोषाध्यक्षपद सोपवले आहे. २० वर्षापेक्षा अधिक काळ ही जबाबदारी पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा …

अधिक वाचा

पाकिस्तानचा दौरा सिध्दूला भोवला ;देशद्रोहाचा खटला दाखल

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंग सिध्दू यांना चांगलंच भोवलंय. मुजफ्फरपुरमध्ये सिध्दू यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला असून याचिकाकर्ते अधिवक्ता सुधीर ओझा यांनी हा खटला दाखल केलाय. पाकिस्तानच्या सेनाप्रमुखांची गळाभेट घेतली …

अधिक वाचा

योगी आदित्यनाथ यांना कोर्टाने फटकारले

गोरखपूर-गोरखपूर येथील २००७ मधील प्रक्षोभक भाषणाप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुप्रीम कोर्टाने सोमवारी चांगलेच फटकारले. योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रक्षोभक भाषणाप्रकरणी खटला का चालवू शकत नाही, असा सवाल सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला विचारला आहे. उत्तर प्रदेशमधील तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता. २००७ मध्ये …

अधिक वाचा

सांगली महापौरपदी भाजपाच्या संगीता खोत !

सांगली-सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. बहुमतात असलेल्या भाजपाने आपल्या सदस्यांना गोवा सहलीला पाठविले होते. सोमवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. भाजपाकडून संगीता खोत, सविता मदने यांनी अर्ज दाखल …

अधिक वाचा

मध्य प्रदेशातील शाळेच्या पाठ्यपुस्तकात अटलजींचा धडा

जयपूर : मध्य प्रदेशातील शाळेच्या पाठ्यपुस्तकात लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांना वाचायला मिळणार आहे. शाळांच्या पाठ्यपुस्तकात अटलजींच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी ज्या राष्ट्रीय नेत्यांच्या कथांचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केला जातो. त्याअंतर्गतच अटलजींच्या जीवनचरित्राचा …

अधिक वाचा

काँग्रेसने नेते मणिशंकर अय्यर यांचे निलंबन रद्द !

नवी दिल्ली-निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यामुळे काँग्रेसने ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचे निलंबन करण्यात आले होते अखेर हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. गुजरात निवडणूकी दरम्यान अय्यर यांनी मोदी यांच्यावर नीच प्रवृत्तीचा माणूस असा शब्दात टीका केलेली होती, त्यानंतर सर्वत्र काँग्रेसवर टीका होऊ लागली होती त्यामुळे अय्यर …

अधिक वाचा

नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेसमधून निलंबित करा-भाजपची मागणी

नवी दिल्ली – काल पाकिस्तानचे माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या समारंभात माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमाल जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. याच मुद्यावरून भाजपने नवज्योत सिध्दूवर जोरदार टिका केली आहे. राहुल …

अधिक वाचा

‘त्या’ उमेदवारांना बजावली नोटीस

जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत खर्चाचा तपशील न देणार्‍या तब्बल २०७ उमेदवारांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. महानगरपालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. यात ३०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या उमेदवारांनी निवडणुक लढविली परंतु निकाल लागल्यानंतर १५ दिवस उलटूनही निवडणुकीचा खर्च उमेदवारांकडून सादर केला जात नसल्याने मनपा प्रशासनाकडून नोटीसा बजावियात …

अधिक वाचा

मुक्ताईनगरच्या उपनगराध्यक्षपदी मनिषा पाटील

मुक्ताईनगर प्रतिनिधी। येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मनीषा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणुकीनंतरची पहिला सभा शनिवारी पार पडली. यात प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांंजली वाहण्यात आली. त्यानंतर,उपनगराध्यक्ष निवड, स्विकृत नगरसेवकांची निवड प्रकीया पारपडली. उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका मनिषा प्रवीण पाटील यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड …

अधिक वाचा

आसोदा ग्रामसभेत गदारोळ

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा येथील ग्रामसभेत विविध नागरी समस्यांवरून ग्रामस्थांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. घरकुलांचे प्रलंबित प्रस्ताव, गावातील तोडलेल्या स्वच्छतागृहांमुळे होणारी असुविधा, शौचालयांसह विविध मूलभूत प्रश्‍नांवर शनिवारी झालेल्या आसोदा येथील ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नबाबाई बिर्‍हाडे होत्या. तथापि, अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील शासकीय अधिकार्‍यांनी ग्रामसभेला …

अधिक वाचा