Thursday , January 17 2019
Breaking News

राजकारण

राष्ट्रवादीची लोकसभेसाठी जाहिरनामा समिती जाहीर

अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनामा समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली असून या समितीमध्ये २२ सदस्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली. या समितीमध्ये सदस्य म्हणून …

अधिक वाचा

राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार जळगाव, रावेर

दिलीप वळसे-पाटील यांची माहिती, चर्चा सुरू असल्याची दिली माहिती जळगाव । लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा लढविण्यास राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी असल्याचे पक्षाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी जळगावमध्ये सांगितले. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, मात्र दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. जागांच्या चर्चेत गुंतून …

अधिक वाचा

भाजप-सेनेच्या युतीची चर्चा सुरु 

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना विश्‍वास पिंपरी :  सेना-भाजपच्या युतीबाबत मला तिळमात्र शंका नाही. भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चा सुरु आहे.लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना पक्ष युती करुन एकत्रित निवडणुका लढवतील, याविषशी अनेक लोकांच्या मनात शंका आहे. राज्यात भाजप-सेना एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करीत असली, तरी त्यांची पाच वर्षांची भांडणे शेवटी मिटतील. त्यामुळे भाजप-सेनेला रिपाइंच्या पाठिंब्यावर …

अधिक वाचा

कर्नाटकातील सरकार पडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न; कॉंग्रेसचे तीन आमदार मुंबईत !

बंगळूर- कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून जोरदार हालचाली सुरु आहे. काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजपा नेत्यांसोबत आहेत असा दावा जलसिंचन मंत्री डी.के.शिवकुमार यांनी केला. राज्यात घोडेबाजार सुरु आहे. आमचे तीन आमदार मुंबईत हॉटेलमध्ये असून भाजपा आमदार आणि नेते त्यांच्यासोबत आहेत. कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएसची सत्ता स्थापन होण्यामागे शिवकुमार यांची भूमिका …

अधिक वाचा

जेएनयूमधील देशविरोधी घोषणेचा तपास पूर्ण; १० जणांवर दोषारोप !

नवी दिल्ली- दिल्लीतील जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. त्याबाबत तपास सुरु होते, तो तपास पूर्ण झाला आहे. याप्रकरणी आज विशेष पथकाकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या दोषारोपपत्रात जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार, सैयर उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह १० …

अधिक वाचा

भाजपचा ठोकशाहीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेचा प्रयत्न हाणून पाडा-अशोक चव्हाण

गडचिरोली – काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा आज गडचिरोलीत आहे. यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार लोकशाही संपविण्याची भाषा करत आहे. हे सरकार आल्यापासून अशा घटना समोर येत आहे, यावरून असे दिसते की लोकशाही संपविण्यासाठीच हे सरकार काम करत आहे अशी …

अधिक वाचा

अरविंद केजरीवाल यांना मुलीच्या अपहरणाची धमकी !

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांची मुलगी हर्षिता याचे अपहरण करण्याची धमकी देण्यात आली आहे. तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातील मेलवर धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर केजरीवाल यांच्या मुलीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धमकीची चौकशी करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. …

अधिक वाचा

दुष्काळ पडला असताना केंद्राने एक रुपयाही राज्याला दिला नाही – अजित पवार

पालघर : महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला आहे परंतु केंद्राने एक रुपयाही राज्याला दिला नाही. याविषयी विधानसभेत आणि विधानपरिषदेमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर केंद्राचे पथक पाहणी करण्यासाठी आले, परंतु या पथकाने रात्रीची पाहणी केली.अ‌शी रात्रीची पाहणी कुणी केली होती का? असा सवाल अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी …

अधिक वाचा

यूपीत कॉंग्रेसची ‘एकला चलो’ची भूमिका; लढविणार सर्व जागा !

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी केल्यानंतर काँग्रेसने सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व ८० मतदारसंघात लढण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतले आहे. सर्व जागा कॉंग्रेस लढविणार असून निवडणुकीचा निकाल आश्चर्यचकीत करणारा असेल, असे काँग्रेस ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद …

अधिक वाचा

मोदींना २०१४मधील भाषणे ऐकविली तर ते प्रचारालाही बाहेर पडणार नाही-धनंजय मुंडे

विक्रमगड -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा संपूर्ण राज्यभरात सुरु आहे. आज विक्रमगड येथे जाहीर सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भाजप सरकारला लक्ष केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. २०१४ च्या निवडणुकीतील मोदींची भाषणे ऐकली की गजनी चित्रपटातील अभिनेता आमिर खानच्या भूमिकेची आठवण येते अशा …

अधिक वाचा
error: Content is protected !!