Tuesday , October 16 2018
Breaking News

पिंपरी-चिंचवड

दगडाने ठेचून तरुणाची हत्या

पिंपरी : तळवडे गावातील स्मशानभूमीजवळ  अज्ञात २५ ते ३० वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळला आहे. याबात नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. देहूरोड पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या तळवडे येथील स्मशानभूमीजवळ मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. देहूरोड पोलिसांच्या हद्दीतील …

अधिक वाचा

शहरात दांडिया, रास गरब्याची वाढली रंगत

पारंपरिक वेशभूषेत फिरतेय तरूणाई पिंपरी : एका तालात थिरकणारे पाय दांडियाच्या अन् कानावर पडणार्‍या संगीताच्या तालावर घुमणारे विविधरंगी घागरे आणि रास गरब्यांच्या रंगांबरोबर रंगलेली तरुणाई असा नवरात्रोत्सवाचा जल्लोष सध्या पिंपरी-चिंचवड परिसरात पहायला मिळत आहे. शहरातील मंडळासह परिसरातील अनेक मंडळांमध्ये दांडिया, रास गरब्याची रंगत वाढत आहे. सायंकाळी सात वाजल्यापासून शहरातील नवरात्रोत्सव …

अधिक वाचा

मॉडर्न हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची मतदार जागृती फेरी

निगडी : भोसरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी निवडणुकीत जागृतपणे मतदान करावे यासाठी निगडी येथील मॉडर्न हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. यावेळी मॉडर्नच्या ढोल पथकाच्या गजरात संपूर्ण यमुनानगर परिसर दुमदुमून गेला होता. निवडणूक विभागाकडून 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान नवीन मतदार नोंदणी अभियान चालू केले आहे. लोकांमध्ये याबाबतची जागृती करण्यासाठी पाचवी …

अधिक वाचा

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात संसर्गजन्य रोगांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाली वाढ

डेंग्यू, चिकनगुन्यासारखे रोग पसरु नयेत यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी! पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आवाहन पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्या सारखे रोग पसरु नयेत यासाठी खबरदारी घेण्यात यावी. ताप, तीव्र डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, स्नायु अथवा सांधेदुखी, मळमळणे, उल्टी अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. योग्य वैद्यकिय उपचाराने डेंग्यु, …

अधिक वाचा

समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञान दृष्टीकोन गरजेचा

भास्कर सदाकळे यांनी केले मार्गदर्शन चिंचवड : समाजाची प्रगती व्हायची असेल तर विज्ञान दृष्टीकोन असावयास हवा, असे प्रतिपादन विज्ञान बोध वाहिनीचे संयोजक भास्कर सदाकळे यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने फिरते थ्री डी नभांगण, खगोलविज्ञान आणि …

अधिक वाचा

बेगडेवाडी स्थानकात आपत्कालिन चाचणी

तहसीलदारांनी केली पाहणी तळेगाव दाभाडे : बेगडेवाडी  रेल्वे स्थानकामध्ये रेल्वेरुळा वरून रेल्वेचा डब्बा घसरल्याचा निरोप आला व प्रशासनाची जोरदार धावपळ झाली. प्रत्यक्ष पाहता आपत्कालीन घटनेच्या प्रसंगी प्रशासन सज्ज असावे म्हणून केलेला प्रयोग होता, असे निदर्शनास आले. याबाबतची हकीकत अशी की, सकाळी अकरा वाजता तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक …

अधिक वाचा

सायन्स सेंटर उभारणार

पिंपरी : महापालिकेच्या 105 शाळांमध्ये कायमस्वरुपी सायन्स सेंटर उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे. शिक्षण समितीने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे. शिक्षण विभागाच्या अखर्चित निधीतून हा निधी उभारला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टरजवळ सायन्स सेंटर उभारण्यात आले आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी …

अधिक वाचा

काचा फोडणारे गजाआड

चिंचवड: किरकोळ कारणावरुन जमाव जमवून ट्रक चालकाला मारहाण करत तोडफोड करणार्‍या पाच जणांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. फरदीन बाबर शेख (वय 19, रा. दत्तनगर, चिंचवड), सागर झोरबाडे (वय 21, रा. शंकरनगर, चिंचवड), सुग्रीव काळे, अजय बारसकर (वय 22, रा.चिंचवड), दीपक गिरी (रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची …

अधिक वाचा

भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची अटक व सुटका

टोल नाका आंदोलन प्रकरण चिंचवड : नाशिक फाटा येथील 2006 मध्ये टोल नाका फोडल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या प्रदेशवर काम करणार्‍या एका जुन्या पदाधिकार्‍याला पोलिसांनी वॉरंट बजावत अटक केले होते. अटक करुन जामीनावर सुटका केली. दरम्यान, केंद्रात, राज्यात, महापालिकेत सत्ता असूनही भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय सुरु असून शहरातील वरिष्ठ नेते …

अधिक वाचा

कचरा प्रकल्पास जोरदार विरोध; काम पाडले बंद

शहरात जमा होणार्‍या कचर्‍याचे त्या-त्या प्रभागात जिरवण्याचा प्रयत्न नगर परिषदेच्या अधिकारी-ग्रामस्थांमध्ये हमरीतुमरी चाकण : चाकण शहरात जमा होणार्‍या कचर्‍याचे शास्त्रोक्त पद्धतीने त्या-त्या प्रभागांमध्ये जिरवण्याचा चाकण नगरपरिषदेचा प्रयत्न जोरदार विरोध आणि वादावादीमध्ये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगरवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या जवळ कचरा विघटन प्रकल्प सुरु करण्यास गेलेल्या नगरपरिषदेच्या अधिकारी …

अधिक वाचा
error: Content is protected !!