Tuesday , June 19 2018
Breaking News

पुणे शहर

विठ्ठलवाडी शाळेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल

पुणे । दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील विठ्ठलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या यशोगाथेची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडिया आणि याचे फायदे या विषयावर देशभरात लाईव्ह व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली होती. या कॉन्फरन्साठी महाराष्ट्रच्या टीममध्ये विठ्ठलवाडी शाळेतील शिक्षक युवराज घोगरे यांना सहभागी होण्याची संधी मिळाली होती. इतरही …

अधिक वाचा

कर्जबाजारी सरकारची अधिवेशनावर उधळपट्टी

पुणे । राज्यावर दिवसेंदिवस कर्जाचे डोंगर वाढत असताना दुसरीकडे सरकरकडून पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे नागपूर येथे होणार्‍या हिवाळी अधिवेशनावर होणार्‍या खर्चाबद्दल माहिती मागितली होती. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. नागपूर येथे होणार्‍या हिवाळी अधिवेशनात राज्य …

अधिक वाचा

शिस्तबद्ध पर्यटनासाठी दुर्गादेवी देवराईमध्ये महास्वच्छता

जुन्नर । जुन्नर तालुका पर्यटन तालुका नुकताच घोषित करण्यात आला आहे. येथील परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने पर्यटन कसे घडेल यासाठी हातवीजच्या दुर्गवाडी येथील अतिदुर्गम भागातील देवराई मध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता, वृक्ष व बिजारोपण उपक्रम, चला मारू फेरफटका परिवार व निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज परीवारातर्फे राबविण्यात आला होता. या उपक्रमात …

अधिक वाचा

बेकायदा पाणी उचलल्याने 46 शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल

पुणे । बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, को-हाळे बुद्रुक गावच्या हद्दीतील नीरा डाव्या कालव्यातून बेकायदा पाणी उचलल्याने 46 शेतकर्‍यांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत महेश अशोक साळुंके (वय 30, कालवा निरीक्षक वडगाव पाटबंधारे शाखा) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. …

अधिक वाचा

पुण्यात भाड्याचे पैसे देण्यावरून वाद; रिक्षाचालकाने प्रवाशाचा केला खून

पुणे-अवघ्या २० रुपयांच्या वादातून पुण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाचा जीव घेतल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. भाड्याचे पूर्ण पैसे का नाहीत? यावरून प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात वाद सुरु झाला. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये प्रवासी गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. तानाजी धोंडीराम कोरके असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव …

अधिक वाचा

नियमांना बगल देणे ही माझी सवय-शरद पवार

पुणे-नियमांना बगल देणे ही माझी सवयच आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पुण्यात झिपऱ्या या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी शरद पवार आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. सभागृहात हशा पिकला पवार यांनी यावेळी सिंहासन या सिनेमाचा किस्साही सांगितला. सिंहासन हा मराठीतला गाजलेला राजकीय चित्रपट आहे. या …

अधिक वाचा

शिक्रापूरात अनधिकृत फ्लेक्स मनोर्‍यामुळे अपघाताचा धोका

शिक्रापूर । शिक्रापूर ता. शिरूर येथे पुणे-नगर रस्त्यावर अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फ्लेक्सच्या मनोर्‍यामुळे अनेक लहान मोठे अपघात झालेले आहेत. अद्यापही या ठिकाणी मोठमोठे अपघात होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यातदेखील वार्‍यामुळे फ्लेक्स फाटून विद्युत तारांमध्ये अडकून शॉर्टसर्किट होऊन मोठा स्फोट झाला होता. त्यामुळे या ठिकाणी असलेले सर्व फ्लेक्सचे मनोरे धारकांवर कारवाई …

अधिक वाचा

मनसेकडून आळेफाटा बंदची हाक

पुणे । कर्तव्यावरील महिला पोलीस अधिकार्‍याला शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत मनसे आमदार शरद सोनावणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या गोष्टिचा निषेध म्हणून रविवारी आळेफाटा गाव बंद ठेवले आहे.संबधित महिला पोलीस अधिकारी आणि त्यांच्या सहकर्‍यांनी जप्त केलेल्या भोंडवे यांच्या गाडितील गहु हा चोरीचा …

अधिक वाचा

कर्नाटकमधील पोलीस सीबीआयपेक्षा प्रभावी

पुणे । कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ज्या पद्धतीने कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. ज्या वेगाने हा तपास झाला ते महत्त्वाचे आणि स्वागतार्ह आहे, असे मत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले. गौरी लंकेश यांच्या खुनाला 1 …

अधिक वाचा

प्लास्टिक बंदीविरोधात आता व्यापार्‍यांचा संप

पुणे । राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाविरोधात आता व्यापारी संघटना एकवटल्या आहेत. द फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने या बंदीविरोधात संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू करताना सर्वांगिण विचार केलेला नसल्याचा दावा व्यापार्‍यांनी केला आहे. राज्यातील 13 लाख छोट्या-मोठ्या दुकानदारांवर या बंदीचा परिणाम …

अधिक वाचा
error: Content is protected !!