Thursday , January 17 2019
Breaking News

रॉबर्ट वाड्राने मनी लाँड्रिंगच्या पैशातून लंडनमध्ये घेतले फ्लॅट; ईडीचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली – सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान एक गंभीर गौप्यस्फोट करण्यात आला आहे. रॉबर्ट वाड्रा हे लंडनमधील एका फ्लॅटचे व्हर्चुअल ऑनर असल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे १६ कोटी ८० लाख रुपये असल्याचे ईडीने म्हटले आहे.

रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्तीय मनोज अरोडा यांच्याविरोधा अजामिनपात्र वॉरंटसाठी ईडीने अरविंदा कुमार यांच्या विशेष न्यायालयात धाव घेतली होती. अरोडा हा ईडीने टाकलेल्या धाडींनंतर फरार झालेला आहे. दरम्यान, लंडनमध्ये खरेदी करण्यात आलेली संपत्ती मनी लाँड्रिंगमधील पैशातून खरेदी करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. मनोज अरोडा हा या व्यवहाराचा साक्षीदार आहे. तसेच या व्यवहाराविषयी सर्व काही माहित आहे, असा दावा ईडीकडून करण्यात येत आहे.

हा फ्लॅट फरार संजय भंडारी याने १६ कोटी ८० लाख रुपयांना खरेदी केला होता. तसेच वाड्रा यांचे नियंत्रण असलेल्या फर्मने हा फ्लॅट त्याच किमतीत भंडारी याच्याकडून खरेदी केला होता. भंडारीविरोधात ऑफिशियर सिक्रेट अॅक्ट अंतर्गत २०१६ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. प्राप्तिकर विभागाने भंडारीच्या दिल्ली आणि गुडगाव येथील मालमत्ता जप्त केल्या होता. मात्र भंडारीच्या ठावठिकाण्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणा; एक-दोन दिवसात मिळणार डिस्चार्ज-भाजप

नवी दिल्ली-भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!