Sunday , September 23 2018
Breaking News

क्रीडा

कोणालाही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नाही :रविंद्र जाडेजा

दुबई:प्रदीर्घ कालावधीनंतर भारताच्या वन-डे संघात पदार्पण करणाऱ्या रविंद्र जाडेजाने पहिल्याच सामन्यात ४ बळी घेऊन आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. या कामगिरीसाठी जाडेजाला सामनावीराचा किताब देऊनही गौरवण्यात आलं. हा किताब स्विकारत असताना, रविंद्र जाडेजाने आपल्याला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. हे पुनरागमन माझ्या नेहमी लक्षात राहिलं, कारण …

अधिक वाचा

आशिया कपमध्ये पंड्यासह ठाकूर आणि पटेल यांना विश्रांती; चाहरला संधी

दुबई : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत – पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात जखमी झालेल्या हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्यासह शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. तर पंड्याच्या जागी दीपक चाहरला संधी देण्यात आली असून तो दुबईत दाखल झाला आहे. बुधवारी भारत – पाकिस्तान …

अधिक वाचा

पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयासाठी अमेरिकेला आनंद ; भारताला शुभेच्छा

मुंबई : आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचं भारत-पाकिस्तान मध्ये होणाऱ्या या सामन्यावर लक्ष होतं. पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयावर भारतालाच नाही तर अमेरिकेला देखील आनंद झाला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांनी भारताला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट …

अधिक वाचा

जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत आदर्श विद्यालय प्रथम 

तळेगाव : जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी कार्यालय  पुणे द्वारा घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय  नेट बॉल स्पर्धेत तळेगाव येथील आदर्श विद्यामंदिर  शाळेने जिल्हास्तरावर दोन्हीही संघांनी प्रथम  क्रमांक पटकावला. मुले व मुलीच्या 14 व 17 वर्ष वयोगटातील या स्पर्धेचे आयोजन बारामती येथील  टी.सी. महाविद्यालयात नुकतेच करण्यात आले  होते. मुले व …

अधिक वाचा

भारत -पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार ?तुम्हाला काय वाटते

आज होत असलेल्या आशियाचषकात  भारत -पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार यांची  उत्सुकता  सगळ्यांना आहे …तुमच्या मते कोण जिंकणार ?   Share on: WhatsApp

अधिक वाचा

आशिया कपमध्ये आज भारताचा पाकिस्तानशी सामना

मुंबई : आशिया कपमध्ये आज क्रिकेट चाहत्यांना एक सुपरहिट सामना पाहायला मिळणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान संघ आज एकमेकांशी भिडणार आहेत.आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत ११ वेळा सामना झाला असून भारतानं सहा वेळा तर पाकिस्ताननं ४ वेळा विजय मिळवला आहे. तर एक सामना ड्रॉ …

अधिक वाचा

भारतासाठी वेगळे नियम का ?पाक कर्णधार सरफराज अहमदचा सवाल

दुबई: आज दुबईत रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी, दोन्ही संघांमध्ये शाब्दीक द्वंद्वाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघासाठी स्पर्धेच्या आयोजन समितीने वेळापत्रकात बदल करुन, भारताचे सर्व सामने दुबईला ठेवले आहेत. मात्र इतर संघांना दुबई आणि अबुधाबी या दोन्ही मैदानांवर सामने खेळायचे आहेत. नेमक्या याच मुद्द्यावर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने बोट ठेवलं …

अधिक वाचा

सानिया मिर्झाने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

दिल्ली :भारत आणि पाकिस्तान संघामधील हाय व्होल्टेज सामन्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दारुण पराभव पत्करल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान बुधवारी एकमेकांसमोर उभे ठाकतील, तेव्हा संपूर्ण विश्वाचे लक्ष या सामन्याकडे वेधले जाईल. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे व लढतीच्या …

अधिक वाचा

सिंधू उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल

दिल्ली :भारताची तरुण बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने जागतिक क्रमवारीत ३९ व्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या साएना कावाकामीचा २१-१५, २१-१३ अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. २०१६ साली सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. दुसरीकडे भारताची फुलराणी सायना नेहवालला मात्र …

अधिक वाचा

विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय अयोग्य :संदीप पाटील

दिल्ली :दुबईतील आशिया चषकात कर्णधार विराट कोहलीला दिलेल्या विश्रांतीवर निवड समितीचे माजी प्रमुख संदीप पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘द क्विंट’ या वृत्तपत्रासाठी लिहीलेल्या लेखात संदीप पाटील यांनी आपलं मत मांडलं आहे. साखळी फेरीत भारताला हाँगकाँग आणि पाकिस्ताशी सामना करायचा आहे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात …

अधिक वाचा
error: Content is protected !!