Thursday , January 17 2019
Breaking News

राज्य

याचिका फेटाळल्याने नागपुरात वकिलाकडून न्यायाधीशांना मारहाण

नागपूर-एका खटल्यासंदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळल्याने चिडलेल्या एका सरकारी वकिलाने थेट न्यायाधीशांच्याच कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर येथे आज घडला. याप्रकरणी हल्लेखोर वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्या. के.आर.देशपांडे असे मारहाण झालेल्या न्यायाधिशांचे नाव असून ते सिव्हील कोर्टात न्यायाधीश आहेत. तर अॅड.समीर पराटे असे हल्लेखोर सरकारी वकिलाचे नाव आहे. …

अधिक वाचा

ट्रायच्या निर्णयाविरोधात उद्या सायंकाळी राज्यभरात केबल बंद !

मुंबई : वाहिनीनुसार पैसे घेण्याचा निर्णय ट्रायने जाहीर केला आहे. मात्र या निर्णयाचा राज्यातील केबल व्यावसायिकांकडून विरोध होत आहे. दरम्यान आज केबल व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये या निर्णयाविरोधात गुरुवारी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत राज्यातील केबल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आमदार अनिल परब यांनी …

अधिक वाचा

मित्रपक्ष नाराज होऊ नये यासाठी भाजपचे नमते धोरण; सेनेवर टीका न करण्याची भूमिका

shivsena-bjp

मुंबई- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जागावाटप तसेच इतर बाबतीत आतापासून तयारी सुरु झाली आहे. दरम्यान भाजपसोबतची युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने भाजपने मित्रपक्ष दुखविला जावू नये यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील पराभवानंतर भाजपा एक पाऊल मागे जाताना दिसत आहे. मित्रपक्षांच्या बाबातीत …

अधिक वाचा

नववर्षातील पहिल्याच आठवड्यात शासकीय अधिकारी संपावर !

मुंबई- नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात ५ जानेवारीला राज्य सरकारच्या विविध खात्यातील अधिकारी संप करणार आहे. येत्या जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करावा, केंद्र सरकारप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून ६० वर्षे करावी, सरकारच्या विविध विभाग आणि खात्यांमध्ये रिक्त पडे तातडीने भरावीत यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार …

अधिक वाचा

बीडमधील हत्याप्रकरणी मुख्य आरोपींना अटक

बीड- बीडमध्ये बहिणीने प्रेमविवाह केल्याने मेहुण्याकडून बहिणीच्या पतीची हत्या करण्यात आली. सुमित असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली आहे. भररस्त्यात निर्घृणपणे खून करणाऱ्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना पाच दिवसांनंतर पोलिसांनी अकोला परिसरातून अटक करण्यात आली आहे. या खूनाचा कट रचणारा कृष्णा क्षीरसागर …

अधिक वाचा

यवतमाळ-कळंब रोडवर अपघात; ११ जणांचा मृत्यू

यवतमाळ- यवतमाळ-कळंब रोडवर चापर्डाजवळ ट्रक आणि क्रुझर जीपमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ११ जण ठार झाले आहे. सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात ठार झालेले सगळेजण कळंब तालुक्यातील पारडी या गावातले रहिवासी होते. यवतमाळमध्ये कामासाठी गेले होते. तिथून परतत असताना हा भीषण अपघात …

अधिक वाचा

हिंदूंच्या भावनेशी खेळ केल्यास ठोकून काढू; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

सोलापूर-राम मंदिर आम्हीच बांधणार अशी वल्गना ही सरकार करते मात्र प्रत्यक्षात काम करत नाही. ‘अच्छे दिन येणार, १५ लाख देणार असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण केले नाही. आश्वासन पूर्ण केले नाही. काही हरकत नाही. तुम्हाला माफ करू, परंतू हिंदूंच्या धार्मिक भावनेशी खेळ केल्यास भाजपला ठोकून काढू अशा …

अधिक वाचा

राफेल प्रमाणेच पीकविमेच्या नावाखाली घोटाळा

सोलापूर-ज्या सैन्यबळावर देश सुरक्षित आहे. त्या सैन्यदलाच्या विमान खरेदीत राफेल घोटाळा केला. राफेलच्या मुद्द्यावरून कोर्टाने कसे क्लीन चीट दिले याबाबत मी बोलणार नाही. परंतू राफेल प्रमाणेच या सरकारने पीकविमा योजनेत देखील घोटाळा केला आहे. अनुभव नसलेल्या कंपनीला राफेलचे काम दिले तसेच अनुभव नसलेल्या कंपनीला पीकविमेचे काम दिले, त्यातून घोटाळा केला …

अधिक वाचा

कुंभकर्णाला जागं करण्यासाठी पंढरपुरात आलो आहे; उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला

सोलापूर-राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. अयोध्येत सरयू नदीकाठी शिवसेनेने महामेळावा घेऊन राम मंदिर उभारण्याची मागणी केली. त्याच धर्तीवर आज चंद्रभागा नदीकाठी पंढरपुरात शिवसेना महामेळावा घेत आहे. झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी शिवसेनेचा हा मेळावा असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सरकारला टोला लगावला. अयोध्येत झोपलेल्या कुंभकर्णाला …

अधिक वाचा

‘विठाई’ वारकऱ्यांच्या सेवेत दाखल; उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन संपन्न

सोलापूर-पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. शिवशाहीप्रमाणे असणाऱ्या या सेवेचे ‘विठाई’ असे नाव आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पंढरपुरात या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची ही संकल्पना आहे. पंढरपुर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशीनिमित्त दहा …

अधिक वाचा
error: Content is protected !!