Sunday , January 20 2019
Breaking News

राज्य

तुकाराम मुंढे यांची बदली झाली म्हणून महापौरांनी फटाके फोडत साजरा केला आंदोत्सव

नाशिक – महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आज बदलीचे पत्र मिळाले आहे. मंत्रालयात त्यांची बदली करण्यात आली आहे. आज पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपले आयुक्त कार्यालय सोडले. मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडल्याची बातमी कळताच, नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या बंगल्याबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी महापौर रंजना भानसी यांच्या रामायण …

अधिक वाचा

दूध तसेच अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप-गिरीश बापट

मुंबई-दूध तसेच अन्य अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार असून यंदाच्या अधिवेशनातच हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. विधान परिषदेत दूध भेसळीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज उत्तर दिले. दूध तसेच अन्य अन्नपदार्थात भेसळ …

अधिक वाचा

हिंदूंच्या भावना घेऊन मी अयोध्येला जातो आहे-उद्धव ठाकरे

नवी दिल्ली – छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त हिंदूंचे दैवत आहेत. म्हणूनच शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना घेऊन मी अयोध्येला निघालो आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करणार आहे. दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आज शिवनेरी येथे जाऊन शिवरायांच्या जन्मस्थानाला भेट दिली. प्रत्येक …

अधिक वाचा

कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही-मुख्यमंत्री

मुंबई-मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागला आहे. अहवाल प्राप्त झाला असून १ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल अशी चर्चा सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा खुलासा विधानसभेत केला. …

अधिक वाचा

मराठा, धनगर आरक्षणाचा अहवाल सभागृहात ठेवा अन्यथा सभागृह चालू देणार नाही-अजित पवार

मुंबई-मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सोपविण्यात आला आहे. दरम्यान विधिमंडळ अधिवेशन सुरु असून हा अहवाल सभागृहात ठेवण्यात यावा अशी मागणी होत आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा देखील ‘टीस’चा अहवाल प्राप्त झाला असून हे दोन्ही अहवाल सभागृहात ठेवण्यात यावे अन्यथा सभागृह चालू देणार नाही असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …

अधिक वाचा

पुन्हा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बदलीची चर्चा

नाशिक-शिस्तप्रिय अधिकारी आणि भ्रष्ट्राचार विरोधी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सध्या नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली होण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंडे यांची बदली होणार असल्याची चर्चा असून एक- दोन दिवसात यासंदर्भातील परिपत्रक काढले जाईल, असे सांगण्यात येत आहे. अद्याप बदलीबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही, असे …

अधिक वाचा

पुलगावातील केंद्रीय दारुगोळा भांडारात स्फोट; सहा जण ठार

वर्धा- सैन्य दलासाठी बॉम्ब, हातबॉम्ब, अग्निबाण, दारूगोळा, अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणाऱ्या वर्धा येथील पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडारात जुने बॉम्ब निकामी करताना स्फोट झाला आहे. या स्फोटात सहा जण ठार तर ११ जण जखमी झाले आहे. आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुदतबाह्य बॉम्ब निकामी केले जात होते. यादरम्यान सहा जणांचा मृत्यू …

अधिक वाचा

साताऱ्यात मुसळधार पाऊस; ओढे, नाले तुडूंब

सातारा – साताऱ्यासह माण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यात आज मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. माण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती ओढे, नाले, बंधारे भरून वाहू लागले आहेत. माण तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी हजेरी लावलेल्या पावसाने आज पहाटेपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. पश्चिम भागातील धामणी, गोंदवले, …

अधिक वाचा

गडचिरोलीत दोन महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली-गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास धानोरा तालुक्यातील निहालकाय जंगलात ही चकमक झाली. पोलिसांच्या अल्ट्रा आणि सी-६० पथकातील जवानांनी ही कामगिरी केली. सुरक्षादलाकडून रविवारी रात्रीपासून नक्षलविरोधी मोहीम सुरु होती. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर हल्ला केला. सुमारे …

अधिक वाचा

शौर्यवान शहीद जवान केशव गोसावींना कन्यारत्न!

नाशिक- जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी (२९) हे भारतीय लष्कराचे जवान पाकने केलेल्या गोळीबारात रविवारी शहीद झाले. दरम्यान शहीद जवानाच्या पत्नीला कन्यारत्न झाले आहे. अपत्याला लष्करात भरती करण्याचे स्वप्न केशव गोसावी यांनी उराशी बाळगले होते. परंतु स्वप्न पाहणाऱ्या केशव गोसावी यांना मुलीच्या जन्माच्या …

अधिक वाचा
error: Content is protected !!