अंगावर मातीची दरड कोसळून दोधेच्या इसमाचा मृत्यू

0

रावेर- तालुक्यातील दोधे येथील इसमाचा मातीची दरड अंगावर कोसळून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील निंभोरासीम येथे 27 फेबु्रवारी रोजी सकाळी 11 वाजेपूर्वी घडली. धर्मराज युवराज घेटे (19, रा.दोधे, ता.रावेर) असे मयत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी निंभोरा पोलिसात राजू भागवत सवर्णे (निंभोरासीम) खांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घेटे हे निंभोरासीम गावाबाहेरून रस्त्याने पायी जात असताना अचानक त्यांच्यावर अंगावर मातीची करड कोसळली व त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तपास हवालदार मेहमूद शहा करीत आहेत.