अंजाळेत वायरमनला मारहाण ; आरोपीला कोठडी

0 1

यावल- तालुक्यातील अंजाळे येथे भूषण भोजू भालेराव या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी दत्ता कृष्णा कोळी यास पोलिसांनी अटक करण्यात आली. आारोपीस बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्यास न्या.डी.जी.जगताप यांनी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीचा जामीन नाकारत जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे.