अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलविली बैठक

0

मुंबई: युजीसी(विद्यापीठ अनुदान आयोग)ने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत आदेश देत नियमावली देखील जाहीर केली आहे. मात्र महाराष्ट्र सरकार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा घेण्याबाबत सकारात्मक नाही. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षेबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलविली आहे. या बैठकीत युजीसीच्या नियमावली आणि परीक्षेबाबत चर्चा होणार आहे.

यूजीसीने विद्यापीठांना परीक्षा घेण्याबाबत आदेश दिले आहे. परीक्षेसाठी नियमावली देखील जाहीर केली आहे. social distancing ठेऊन परीक्षा घेण्याबाबत सूचना देण्यात आलेले आहे. मात्र महराष्ट्रातील अनेक महाविद्यालये क्वारंटाईन सेंटर असल्याने परीक्षा घेणे अवघड असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.