अंतुर्लीच्या शेतकर्‍याचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील अंतुर्ली येथे शेतात गेलेल्या शेतकर्‍याचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. गोपाळ हरिश्चंद्र पाटील (60) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. शेतकरी पाटील कर्की शिवारातील त्यांच्या शेतात काम करीत असतांना शेतातील झाडावरील मधमाशांचे पोळ अचानक खवळल्याने धमाशांनी पाटील यांना चावा घेतल्याने ते बेशुद्ध झाले. ही घटना लक्षात येताच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर बर्‍हाणपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरातून मधमाशांचे काटे काढल्यानंतरही त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.