ADVERTISEMENT
मुंबई: अंधेरी इस्ट येथील एमआयडीसीतील रोल्टा टेक्नोलॉजी या कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. इमारत रिक्त करण्याचे काम सुरु असून मदतकार्य राबविण्यात येत आहे. परिसरातील सर्व इमारती खाली केल्या जात आहे.