अक्कलकुव्याच्या ग्रामसेवकाचा तापी नदीपुलावर अपघाती मृत्यू !

0

नंदुरबार: अक्कलकुवा पंचायत समिती अतर्गत असलेल्या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक महेंद्र श्रावण जाधव यांचा कुकरमुंडा येथील तापीनदी पुलावर अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी मोटारसायकलवरून अक्कलकुवाहुन नंदुरबारकडे येत असताना कुकरमुंडा येथील पुलावर हा अपघात झाला. ते पुलावरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

महेंद्र जाधव सध्या अक्कलकुवा पंचायत समिती अंतर्गत रामपूर तालंबा या ग्रामपंचायतीत कार्यरत होते. महेंद्र जाधव यांनी यापूर्वी नंदुरबार तालुक्यात देखील सेवा बजावली आहे.