अखेर ठरले; २० मार्चची पहाट निर्भयातील दोषींसाठी अखेरची !

0

नवी दिल्ली : २०१२ मधील दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना अखेर फाशीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. चार दोषींसाठी 20 मार्चची पहाट अखेरची ठरणार आहे. २० मार्चला पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. निर्भायातील दोषींनी न्यायालयात आव्हान दिल्याने फाशीची शिक्षा लांबणीवर पडली होती. दोषींपैकी एकाने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती, ती याचिका फेटाळण्यात आली होती. त्यामुळे फाशीचा मार्ग मोकळा झाला होता.