अखेर तान्हाजी चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

0

मुंबई : मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री झाला आहे. महाराष्ट्रात देखील तान्हाजी टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी होत होती. अखेर महराष्ट्रात ‘तान्हाजी’ टॅक्स फ्री करण्यात आला आहे. आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तान्हाजी टॅक्स फ्री होत नसल्याने महाराष्ट्र सरकारवर टीका देखील होत होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या माध्यमातून 70 मिमी पडद्यावर आली आहे. ‘तान्हाजी’ या चित्रपटाने 2020मधील 100 कोटींचा टप्पा गाठणारा पहिला चित्रपट म्हणून मान मिळविला आहे. या चित्रपटला उत्तर प्रदेश, हरयाणा सरकारने करमुक्त केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातही करमुक्त करण्यात आला आहे.