अखेर हिंगणघाट पीडितेचा मृतदेह कुटुंबीयांनी स्वीकारला !

0

नागपूर: जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत मुलीवर उपचार सुरु होते. मात्र मृत्यूशी झुंज देण्यात तरुणी अपयशी ठरली. आज सोमवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. जोपर्यंत आरोपींवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी घेतली होती. लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आश्वासन दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना घेराव घालण्यात आले होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम हे पीडितेकडून कोर्टात भूमिका मांडणार आहे. उद्या उज्ज्वल निकम हे नागपूरला जाणार आहेत.