BREAKING: अजूनही वेळ गेलेली नाही; उद्धव ठाकरेंकडून चर्चेचे संकेत

0

मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा १५ दिवसानंतर देखील सुटलेला नाही. भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. मात्र बहुमत भाजपकडे नसल्याने सत्ता स्थापनेला अडचण होत आहे. भाजप कोअर कमिटीची बैठक सुरु असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख यांनी आमदारांची रिट्रीट या हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे पुनरुच्चार करत आमदारांशी चर्चा केली. तसेच त्यांनी अजूनही वेळ गेलेली नसल्याचे सांगत भाजपला चर्चेचे संकेत दिले आहे.

हॉटेल रिट्रीट येथे शिवसेनेचे सर्व आमदार थांबले आहे. त्याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा आमदारांना पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे.