अटी न ठेवता सर्वांनाच सरसकट स्वस्त धान्य द्या

0

दीपक धांडे यांनी नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

भुसावळ : सर्व नागरीकांना कोणतीही अट न ठेवता सरसकट धान्य वाटप करा, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी नायब तहसीलदारांकडे मंगळवारी केली.

नियमानुसार धान्य वाटप नाहीच
सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊन सुरू असल्याने सर्व शेतकरी, व्यावसायक, कष्टकरी, बांधकाम कारागीर, हातमजुरी करणारे हे सर्वच नागरीक गेल्या 22 तारखेपासून घरीच बसून आहेत त्यामुळे कमवणारा व्यक्तीच घरी असल्याने सर्व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे आणि रेशन दुकनदार फक्त प्राधान्य लाभार्थी म्हणजे ज्यांचे अन्न सुरक्षा यादीत नाव आहे असे व अंत्योदय लाभार्थी ज्यांच्याजवळ पिवळे रेशन कार्ड आहे अशांनाच धान्य देत आहे ( ते पण कमी प्रमाणात नियमानुसार नाही) परंतु शासनाच्या वतीने लॉक डाऊन हे सर्व नागरीकांसाठी करण्यात आल्याने ज्यांच्याजवळ केशरी रेशन कार्ड आहे परंतु त्यांचे नाव अन्न सुरक्षा यादीत नाही अशा कुटुंबावर हा अन्यायच आहे तसेच बर्‍याच नागरीकांजवळ केशरी रेशन कार्ड सुध्दा नाही आणि असे लोक सुध्दा शासनाच्या आदेशाचे पालन करीत आहेत. एक प्रकारे अशा नागरीकांवर हा अन्यायच आहे म्हणून शासनाने प्राधान्य लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी असे कुठलेच निकष न ठेवता सर्वांना सरसकट तीन महिने पुरेल असे धान्य त्यात गहू, तांदूळ, ज्वारी, तूरडाळ, तेल, कांदे, बटाटे प्रत्येकाच्या घरी येऊन द्यावे जेणेकरून रेशन दुकानात गर्दी होणार नाही व त्यामुळे कोरोनाचा संसर्गही वाढणार नाही. त्यामुळे शासनाचा लॉक डाऊन चा उद्देश सुध्दा सफल होईल व रेशन घेण्याच्या कारणाने लोक बाहेर सुध्दा येणार नाही. शासनाने या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून सर्व नागरीकांना जीवनावश्यक वस्तू घरपोहोच द्याव्यात, अशी विनंतीही दीपक धांडे यांनी केली ओ. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, जळगावचे पालकमंत्री, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना देण्यात आली आहे.