अडावद परीमंडळातून 23 हजारांचे लाकुड जप्त

0

यावल- यावल वनविभागातील गस्तीवरील पथकाला मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे अडावद परीमंडळातील पांढरी गावातील महसूल क्षैत्रातील गावठी दारूच्या भट्टीवर राखीव जंगलातील साग, अंजन, धावडा, सलाई, तेंदुपत्ता इत्यादी प्रकारचे एकूण 23 हजार रुपये किंमतीचे जळावु लाकुड आढळून आले. दारूच्या भट्टीजवळ कुणीही आढळून आले नाही. पंचनामा केलेले जळावू लाकुड चोपडा आगारात जमा करण्यात आले. ही गस्ती पथकातील वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, सुनील पाटील, शिवाजी माळी, जगदीश ठाकरे,संदीप पंडीत, रमेश भुतेकर, सचिन तडवी, योगेश तेली आदींच्या पथकाने केली.