अत्याचार करून खून करणार्‍यांना कठोर शिक्षा करा

0 2

संत रोहिदास चर्मकार समाज विकास संस्था व राष्ट्रीय चर्मकार महासंघतर्फे आंदोलन करण्याचा इशारा

नवापूर तहसीलदारांसह पोलीस स्थानकात दिले मागणीचे निवेदन

नवापूर । चर्मकार समाजाच्या मुलीचे लैगिक शोषण करुन खुन केला म्हणून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीचे निवेदन संत रोहिदास चर्मकार समाज विकास संस्था व राष्ट्रीय चर्मकार महासंघतर्फे प्रभारी तहसिलदार राजेंद्र नजन व पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना देण्यात आले. यावेळी चर्मकार समाजा महिला सह पुरुष मोठ्या संख्यने उपस्थित होते. चर्मकार समाज मेहनतीने व कष्ट करुन आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करीत असून हा शांतताप्रिय समाज म्हणून याची ओळख आहे. तरी आमच्या समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न्याय मिळाला नाही तर आम्ही समाजबांधव रस्त्यावर उतरुन आंदोलन करु व होणार्‍या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात या आहेत मागण्या
समस्त चर्मकार समाज बांधव आपणाकडे निवेदन सादर करीत आहोत की आमच्या समाजाची शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थीनीचे लैगीक शोषण नवापूर शहरातील (1) जावेद मुनाफ शेख (2) आरीफ घडीयाली (3) महेश विजय पवार हे अनेक दिवसांपासून दबावाखाली व धाक-धमकी देवून करीत होते. सदर विद्यार्थीनीने या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली का या तिन्ही गुन्हेगारांनी स्वत:ला वाचविण्यासाठी सदर विद्यार्थीनीचा खुन केला? याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थीनीचा मृत्युनंतर गुरुवार 26 जुलै 2018 रोजी पोलिस स्टेशन नवापूर येथे फिर्याद नोंदविण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उपरोक्त तिन्ही आरोपी हे गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. यात जावेद मुनाफ शेख हा तडीपार होता याबाबत नवापूर पोलिस स्टेशनला नोंद आहे. या तिन्ही गुन्हेगारांवर कडक शासन शीघ्र गतीने व्हावे व हे वारंवार करीत असेल्या गुन्हेगारांना पोलीस कस्टडी मिळावी. त्यांना जामीन मिळू देवू नये तसेच त्यांच्यावर केस चालवून फाशी किंवा जन्मठेपाची शिक्षा मिळावी. ही कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, यामुळे गावातील वातावरण बिघडत असून आपल्याकडून कार्यवाहीस उशीर झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्‍या
निवेदनावर माजी नगराध्यक्ष दामु बिराडे, नगरसेवक विशाल सांगळे, मनोहर नगराळे, समाजाचे अध्यक्ष छोटु अहिरे, सचिव भगवान चंदु अहिरे, रतिलाल अहिरे, उखडु झांझरे, जितेंद्र अहिरे, विजय ठाकरे, जयेंद्र चव्हाण, तुकाराम अहिरे, नथ्थु अहिरे, मधु अहिरे, वामन अहिरे, छोटालाल चव्हाण, राजाराम ठाकरे, अविनाश बिराडे, राजेद्र अहिरे, प्रदिप अहिरे, दर्शन पाटील, संदु अहिरे, शंकर अहिरे, हिरालाल चव्हाण, योगेश चव्हाण, संजय मोरे, मनु बिराडे, बापु वाघ, राहुल मराठे, दशरथ नगराळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

आईने फोडला हंबरडा
तहसील कार्यालयात निवेदन देते वेळी मुलीचा आईने हंबरडा फोडला होता. आरोपींना कठोर शासन करावे.असे त्या प्रभारी तहसीलदार यांना सांगत होत्या. मुलींचा आठवणीने आईचे दुख अनावर झालेले पाहुन अनेकांचे डोळे पाणावले. सदर गुन्हाचा तपास उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपुत व सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष भंडारी करीत आहे.

कोट-
1. चर्मकार समाजाचा अल्पवयीन विद्यार्थीनीचे लैगिक शोषण केले गेले असुन आरोपी हे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत. यांची विविध गुन्हाची नवापूर पोलिस स्टेशन येथे नोंद आहे. उपद्रवी ते आहेत.त्यांचावर कडक शासन झाले पाहीजे.
– जितेंद्र अहिरे, अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ

2 .पोलीसांनी सर्व आरोपींना अटक केली असुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांचावर कारवाई केली असुन आरोपींचे मागील रेकॉर्ड आमचाकडे आहे.त्यांचावर कडक कारवाई केली जाईल.
– विजयसिंग राजपुत, पोलीस निरीक्षक, नवापूर