अत्याचार प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी

0

जळगाव । पाचोरा शहरातील आदर्श नगरात राहणार्‍या 26 वर्षीय विवाहितेस आपल्या पतीपासून घटस्फोटाचे आमिष दाखवत आरोपी रविंद्र अशोक ब्राम्हणे यांने वेळोवळी अत्याचार करून नंतर लग्नासाठी टाळाटाळ केल्याप्रकरणी पाचोरा पोलीसात चौघांविरोधात 29 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी रविंद्र अशोक ब्राम्हणे (वय-30), अरूण अशोक ब्राम्हणे, विजय अशोक ब्राम्हणे आणि शांताबाई अशोक ब्राम्हणे सर्व रा. मानसिंग नगर पाचोरा हे अरोपी असून यातील आरोपी रविंद्र ब्राम्हणे यास 6 ऑगस्ट रोजी रात्री अटक करण्यात आली असून उर्वरीत तिघे फरार आहेत. यातील अटकेत असलेला आरोपीस आज न्यायालयात हजर केले आसता न्यायालयाने तिन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.