अत्यावश्यक वस्तू चढया भावात विकल्यास फौजदारी कारवाई

0

जामनेर । नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूची दुकान चालकांनी चढ्या भावात विक्री करु नये. रितसर पावती दयावी. तक्रारी आल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिला आहे.

सध्या राज्यासह देशभर कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांची आरोग्याची काळजी घेता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. त्यात नागरिकांची दैनदिन गरज लक्षात घेता शासनाने कर्फ्यू सवलत दिली आहे. जीवनावश्यक वस्तूसाठी किराणा, मेडीकल, भाजीपाला दुकाने काही तासांसाठी खुले आहेत. या दरम्यान संबंधित दुकान चालकांनी विविध वस्तूची चढया भावात विक्री करु नयेे. विक्री केलेल्या वस्तूंची रितसर पावती देणे गरजेचे आहे. कोणी दुकान चालक चढया भावात वस्तूची विक्री करीत असल्यास त्याबाबत नगर पालिका, तहसील कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी. दैनंदिन वस्तूंची महाग दरात विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.