अधिकाऱ्यांच्या सतर्कता अन चांगल्या कामामुळे नवापूरात कोरोनाला “नो एट्री”

0

वाकीपाडा गावातील १५ लोकांना केले शेल्टर हॉलमध्ये कोरेंनटाईन

नवापूर। शहरालगत महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील वाकीपाडा गावातील १५ लोकांना शेल्टर हॉलमध्ये कोरेंनटाईन करण्यात आले असुन लॉकडाऊन झाल्यापासून परराज्यात मजुरीसाठी गेलेले मजूर ८ दिवसापासून वाकीपाडा गावात आलेले होते. या अगोदर वाकीपाडा गावातील सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकीय यंत्रणेला याबाबत माहिती देण्यात आली होती. त्याचवेळेस आरोग्य विभागाकडून त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरातच कोरेंनटाईन केले होते. परंतु पुन्हा येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने परराज्यातून आलेल्या १५ लोकांना तहसीलदार सुनीता जराड, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत ,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, आरोग्य अधिकारी डॉ.हरिचंद्र कोकणी यांनी वाकीपाडा गावाची पाहणी करत परराज्यातून आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना शेल्टर हॉल मध्ये कोरेंनटाईन करण्यात आले. त्यांच्या संपर्कात असलेल्या १५ लोकांचे नातेवाईक यांना ही होम कोरेनंटाईन केले आहे. वाकीपाडा गावातील सरपंच पोलीस पाटील तसेच आरोग्य विभागाचे पथक यांच्या निगराणीत ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी कोकणी यांनी दिली. कोरन्टाईन केलेल्या लोकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा सुचना पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी सूचना दिल्या आहेत.