अधिवेशन: सावरकरांना भारतरत्नसाठी ठराव करा; भाजप आमदार ‘मी पण सावरकर’ टोपी घालून सभागृहात !

0

मुंबई: आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस असल्याने कॉंग्रेसची भूमिका सावरकर विरोधी आहे. मात्र शिवसेनेने सत्तेत येण्यापूर्वी सावरकरांची बाजू घेतलेली आहे. यावरूनच भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याची चिन्हे आहे. आज अधिवेशनात भाजपचे सर्व आमदारांनी’मी पण सावरकर’ टोपी घालून सभागृहात हजर होते. सरकारने सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी ठराव करण्याचा प्रस्ताव मांडावा अशी मागणी केली. या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. ‘मी सावरकर’ अशी टोपी घालण्याची भाजपची दुसरी वेळ आहे. मागील अधिवेशनातही भाजप आमदारांनी ‘मी पण सावरकर’ टोपी घातली होती.

माजी मंत्री भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी सभागृहात प्रस्ताव मांडण्याची मागणी केली. स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणारे होते. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण व्हावे यासाठी तरी सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी ठराव करावा अशी मागणी माजी मंत्री भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी केली.