अनधिकृत घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अधिकृत करा: आमदार लक्ष्मण जगताप

0 1

पिंपरी- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर उभारण्यात आलेली अनधिकृत घरे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अधिकृत करण्यात यावेत. तसेच बांधकामांचा आराखडा एफएसआयनुसार मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्थसंकल्पीय अ धिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या मालकी जागेवर असणार्‍या अनधिकृत घरांबाबत राज्याच्या नगरविकास विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरक ारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचा संकल्प सरकारने केलेला आहे. हा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या मालकी जागांवर झालेली अनधिकृत घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अधिकृत करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत.

या आदेशाचा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवरील अनधिकृत घरांनाही फायदा होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या जागेवर उभारण्यात आलेली अनधिकृत घरे सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अधिकृत करण्यात यावेत. तसेच प्राधिकरण मालकीच्या जागेवर झालेली अतिक्रमणे संबंधितांना भाडेपट्ट्याने देण्याचाही निर्णय सरकारने घ्यावा. त्याचप्रमाणे बांधकामांचा आराखडा एफएसआयनुसार मंजूर करण्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.