अनिल चौधरी मित्र परीवाराकडून रावेर विधानसभेत पाच हजार 235 चष्म्यांचे वाटप

0

रावेर- भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त डिसेंबर 2018 मध्ये अनिल चौधरी मित्र परीवारातर्फे रावेर विधानसभा क्षेत्रातील रावेर आणि यावल तालुक्यातील 11 गावांमध्ये आरोग्य तपासणी व मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले होते. प्रसंगी नेत्र तपासणी करून गरजू पाच हजार 235 नागरीकांना मोफत नजरेच्या चष्म्यांचे घर पोहच वाटप करण्यात आले. चौधरी मित्र परीवारातर्फे बामणोद, न्हावी, पाडळसे, सांगवी, न्हावी, फैजपूर, रोझोदा, विवरे, खिरवड, निंभोरा, पाल या गावांमध्ये मोफत सर्व रोग निदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात आले होते. या शिबिरांत हजारो गरीब ,गरजू नागरीकांनी लाभ घेतला होता.

गरजूंना घरपोहोच चष्म्यांचे वाटप
वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात ज्यांनी नेत्र तपासणी केली होती त्या गरजू पाच हजार 235 नागरीकांना चष्म्यांचे घर पोहोच वाटप करण्यात येत असल्याची माहिती अनिल चौधरी मित्र परीवाराचे धीरज चौधरी यांनी दिली. शीतल पाटील, मुकेश येवले, उमेश नेमाडे, अभिमन्यु चौधरी, कुर्बान शेख, गुणवंत नीळ, दुर्गेश ठाकूर, विवेक पाटील, बबलू खान यासह मित्रमंडळाने परीश्रम घेतले.