अपंगांचा पहिला आनंद मेळावा पाहून भारावलो ः बच्चू कडू

0

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महापालिकेने अपंगांच्या योजना राबवून अपंगांना दोन हजार रुपये पेंशन सुरु केली. महाराष्ट्रातील हा पहिलाच आनंद मेळावा पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडतोय. हा मेळावा पाहून खरोखर भारावून गेलो. अपंगांसाठी काम करताना असा आंनद मेळावा घेऊ असे वाटले होते, ते प्रहारच्या पदाधिकार्‍यांनी करून दाखविले, अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी आनंद व्यक्त केला. प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने रविवारी (दि. 3) सकाळी अकरा वाजता आमदार बच्चु कडू यांच्या उपस्थितीत अपंगांचा आनंद मेळावा घेण्यात आला. मानव कांबळे अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला. यावेळी आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, नगरसेविका उर्मिला काळभोर, अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे आदी उपस्थित होते.

आई संगोपन पुरस्कार प्रदान…

यावेळी आमदार कडू यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका सुनंदा भागवत यांना आई संगोपन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अतितीव्र मातांचाही सन्मान करण्यात आला. नागरवस्ती विभाग यांना अपंगांचे काम योग्य पद्धतीने केले म्हणून विशेष गौरव करण्यात आला. हा पुरस्कार समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी स्विकारला. मेजर मधुकर टोनगावकर व एसकेएफ मित्र मंडळ यांनाही विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. रेवननाथ कर्डीले यांनी केले. आभार रामचंद्र तांबे यांनी मानले.