अपघातग्रस्त रिक्षाच्या टायरची चोरी

0

पाचोरा – मोढांळे रोडवर दि. २१ रोजी भरधाव येणार्‍या कारने पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा पलटी होवुन चार जण जखमी झाले होते. अपघातस्थळी पडुन असलेल्या पॅजो रिक्षाचे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी टायर चोरुन नेल्याची घटना घडली.
पाचोरा तालुक्यातील निंभोरा बु. येथील अशोक पाटील हे गावात भिषण पाणी टंचाई असल्याने स्वत:ची रिक्षा क्रं. एम.एच.१९ क्यु. ०७४०या रिक्षात पिण्यासाठी पाणी घेऊन जात होते. दरम्यान समोरुन एम.एच.१९. ए.एक्स. ०७१९ कारचालक दिपक मोरे हा वाडी कडुन पाचोर्‍याकडे अतिशय भरधाव वेगाने कार चालवित असतांना रिक्क्षाला धडक दिल्याने रिक्क्षातील संगिता अशोक पाटील, भाऊसाहेब गुलाबराव देशमुख, दादाराव व्यकंटराव शेळके, विष्णु सुभाष नलावडे, कार्तिक अशोक पाटील, रिक्षा चालक अशोक पाटील हे रिक्षा पलटी झाल्याने जखमी झाले होते. यात संगिता अशोक पाटील यांचा उजवा पाय व भाऊसाहेब गुलाबराव देशमुख यांचा उपचारा दरम्यान डावा पाय गुडघ्या पासुन कापावा लागला. पिण्याच्या पाण्यामुळे दोघांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. दरम्यान अशोक पाटील यांची पॅजो रिक्षा घटनास्थळीच पडुन असल्याने अज्ञात चोरट्यांनी रिक्षाचे तिन्ही टायरची चोरी केली.