अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचा मानपत्र देऊन सन्मान

0

राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाउंडेशनचा उपक्रम

भुसावळ- कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या भुसावळातील सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची मालेगाव अपर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती झाल्याने शहरातील राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाउंडेशनतर्फे त्यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. भुसावळातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवून भुसावळकरांच्या मनात घर केलेल्या नीलोत्पल यांच्यावर शहरवासीयांचे विशेष प्रेम आहे. या कार्याची दखल फाऊंडेशनने घेत त्यांचा कार्यालयात सन्मान केला. याप्रसंगी नीलोत्पल यांनी भुसावळकरांनी दिलेल्या मान-सन्मान आपल्या भावी आयुष्यासाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगत फाउंडेशनच्या कार्यालाही शुभेच्छा दिल्या. प्रसंगी फाउंडेशनच्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे, उपाध्यक्षा द्रोपदाबाई बाविस्कर, सचिव निर्मला सुरवाडे, सदस्य रेखा सोयंके, सदस्य संगीता सुरवाडे, सदस्य छाया बाविस्कर, प्रियंका शर्मा, भाविका मेढे, आम्रपाली मेढे, योगिनी श्रीवास्तव, पुजा कनोजे, रेणुका आदींची उपस्थिती होती.