अप-डाऊन छपरा एक्स्प्रेसला नाशिक रेल्वे स्थानकावर थांबा

0

भुसावळ- अप 11060 छपरा-एलटीटी व डान 11059 एलटीटी-छपरा एक्स्प्रेसला नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 11059 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा एक्स्प्रेस गाडी दुपारी 2.28 वाजता नाशिक रेल्वे स्थानकावर आल्यानंतर दोन मिनिटे थांबून 2.30 वाजता रवाना होईल. 19 फेब्रुवारीपासून हा थांबा सुरू करण्यात आला आहे तर अप 11060 छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस नाशिक रोड स्टेशनवर सकाळी 11.13 वाजता आल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनससाठी सकाळी 11.15 वाजता रवाना होईल. 17 फेब्रुवारीपासून हा थांबा लागू करण्यात आला आहे.