दुईच्या बारावीच्या विद्यार्थिनीचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू

0

मुक्ताईनगर : तालुक्यातील दुई येथील 18 वर्षीय बारावीची विद्यार्थिनी आजोंबासह दुचाकीने मुक्ताईनगर येथील परीक्षा केंद्रावर शुक्रवारी जात असताना दुई ते पूर्णाड फाट्यादरम्यानच्या राशा बरड लगत समोरून येणार्‍या कंटेनरने धडक दिल्याने या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. मंदा अशोक पाटील (दुई, ता.मुक्ताईनगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. दुई येथील रहिवासी मंदा पाटील ही विद्यार्थिनी आजोबा भगवान गंभीर पाटील यांच्यासह दुचाकीने मुक्ताईनगर परीक्षा केंद्रावर येत असताना भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने मंदाच्या दोन्ही पायांना मोठी ईजा झाल्याने तिला जळगावी उपचारासाठी हलविण्यात येत असतानाच रस्त्यात तिची प्राणज्योत मालवली.