अफूची शेती करणार्‍या दोघांना अटक

0 2

दौंड : मलठण येथे अर्ध्या एकर क्षेत्रात अफूची शेती करणार्‍या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दोघांकडून सुमारे साडेसात लाख रुपये मूल्य असलेले अफूचे पिक जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी संतोष अण्णा ढवळे (वय 48) व विकास झुंबर ढवळे (वय 27, दोघे रा. दौंड) या शेतकर्‍यांना अटक केली आहे.

मलठण येथे अफूची शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुपारी पोलीस उप अधीक्षक सचिन बारी व निरीक्षक सुनील महाडीक यांनी पोलीस पथकासह छापा टाकला. यावेळी संतोष ढवळे व विकास ढवळे यांच्या शेतात कांदा व हरभर्‍याच्या अंतरपिकात बोंडे आणि फुलोर्‍यात अफूची रोपे आढळली. पोलिसांनी सदर रोपे उपटली असता त्यांचे वजन 380 किलो भरले. तस्कर दोन हजार रूपये किलो या दराने शेतकर्‍याकडून अफू विकत घेतात. शेतकर्‍यांकडून तयार अफू विकत घेऊन त्याची विक्री करणार्‍या काही तस्करांशी अटकेतील शेतकर्‍यांचा संपर्क असल्याची माहिती सुनील महाडीक यांनी दिली.