Monday , July 23 2018

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या वकिलांना अटक

ठाणे । अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिक्कीच्या सीडीआरप्रकरणी ठाणे क्राइम ब्रँचनं नवाजुद्दीनचे वकील रिजवान सिदिक्की यांना अटक केली आहे. वकिलांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. पत्नीचे कॉन्टॅक्ट्स आणि ती कुठे आहे यावर नजर ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेराच्या माध्यमातून नवाजुद्दीनने सीडीआर मागवल्याचा आरोप आहे. याआधीच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने रिजवान यांना समन्स बजावले होते.

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे वकील रिजवान सिद्दिकीला यांना मुंबईतील वर्सोवाच्या कार्यालयातून क्राइम ब्रँचकडून अटक करण्यात आली आहे. रिजवान सिद्दिकी या वकिलाने नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या पत्नीचे कॉल रेकॉर्ड्स मागवले होते. याप्रकरणी नवाजुद्दीनसह त्याच्या वकिलांना वारंवार ठाणे पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आले होते. मात्र तरीही ते न्यायलयासमोर हजर न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील अटकेत असलेले आरोपी मकवाना, सीडीआर पुरवणारा अजिंक्य नागरगोजे यांच्याकड़े चौकशी केली असता बॉलिवूड अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याचे वकील रिजवान सिद्दीकी यांचे नाव समोर आले होते. 23 फेब्रुवारीला ठाणे पोलीस उपायुक्तांनी माझा जवाब नोंदवला होता, मात्र माझा जवाब नोंदवला नसल्याचे सांगत 41 ए ची नोटीस न देता मला इथे आणल्याचे नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी म्हटले आहे. सीडीआर प्रकरणी आतापर्यंत खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली होती. सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करून विक्री करत होते. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

हे देखील वाचा

भिवंडी परिसरातील अनधिकृत गोदामासंदर्भात तातडीने कार्यवाही 

डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिले आदेश  नागपूर  : भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!